कोरोनाच्या धास्तीमुळे बाईकवर गावी जाणाऱ्या पती, पत्नी आणि मुलाचा अपघातात मृत्यू

कोरोनाच्या धास्तीमुळे बाईकवर गावी जाणाऱ्या पती, पत्नी आणि मुलाचा अपघातात मृत्यू

कोरोनाच्या धास्तीमुळे सर्जेराव पाटील हे पत्नी आणि मुलाला घेऊन बाईकवर साताऱ्याकडे निघाले होते.

  • Share this:

 डोंबिवली, 29 मार्च: डोंबिवलीतील मोठागाव परिसरातून एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. सर्जेराव पाटील, पत्नी पूनम पाटील आणि 4 वर्षांचा मुलगा अभय पाटील अशी मृतांची नावं आहेत.

कोरोनाच्या धास्तीमुळे सर्जेराव पाटील हे पत्नी आणि मुलाला घेऊन बाईकवर साताऱ्याकडे निघाले होते. ते वाईजवळ पोहोचले असता एका भरधाव ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा चारिटेबल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असाताना तिघांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा..‘हॅलो, मी कोरौनातून बोलतोय’ ऐकल्यावर नातेवाईकही फोन उचलेनात, ग्रामस्थांची व्यथा

मूळचे जांबुर (ता. शाहूवाडी) येथील सर्जेराव पाटील हे मुंबई डोंबिवली येथे राहण्यास होते. या अकस्मात अपघाताने डोंबिवलीमधील मोठागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

हेही वाचा..'कोरोनाचा तिसरा टप्पा धोकादायक, लॉकडाउनने थांबला नाही तर चीनच्या मार्गाने उपाय'

दरम्यान, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, घरातच राहा, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जात आहे. तरी देखील काही लोक जीव धोक्यात टाकत आहेत.

हेही वाचा.. कोरोनाग्रस्तासाठी धावली कोरोनामुक्त व्यक्ती, रुग्णाला वाचवण्यासाठी केलं रक्तदान

गुजरातच्या दिशेनं पायी जाणाऱ्या 5 प्रवाशांचा चिरडले

विरारमधून गुजरातच्या दिशेनं पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला होता. यात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरात कडील हद्द बंद असल्यानं त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. परत वसईच्या दिशेनं येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात तिघे जण हे ट्रकच्या चाकाखाली सापडले गेले. त्यामुळे चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची मात्र ओळख पटली नाही. ओळख पटलेल्या पैकी कल्पेश जोशी (32) तर दुसरा मयांक भट (34) अशी आहेत. तर इतर 3 जखमींना विरारच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

First published: March 29, 2020, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading