Home /News /videsh /

कोरोनाग्रस्तासाठी धावून आली कोरोनामुक्त व्यक्ती, रुग्णाला वाचवण्यासाठी केलं रक्तदान

कोरोनाग्रस्तासाठी धावून आली कोरोनामुक्त व्यक्ती, रुग्णाला वाचवण्यासाठी केलं रक्तदान

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

अमेरिकेतल्या (America) एका रुग्णालयात रक्त (blood) चढवून कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेत.

  ह्युस्टन, 29 मार्च : अमेरिकेत (America) कोरोनामुक्त (Corona cured patient) झालेल्या व्यक्तीचं गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोनाग्रस्त (corona patient) रुग्णाला देण्यात आलं आहे. एका रुग्णालयाने कोरोनाव्हायरसने (coronavirus) पीडित असलेल्या रुग्णावर कोनवालेस्सेंट सीरम थेरेपी म्हणजेच आजारातून  बऱ्या झालेल्या रुग्णाचं रक्त चढवून प्रायोगिक तत्वावर उपचार सुरू केलेत.

  जीवघेण्या अशा कोरोनाव्हायरसवर एका रुग्णाने मात केली. टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर 14 दिवसांनंतरही ही व्यक्ती पूर्णपणे बरी असल्याचं दिसलं. त्यानंतर या व्यक्तीनं ब्लड प्लाझ्मा दान केलं. ह्युस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलमध्ये कोनवालेस्सेंट सीरम थेरेपीसाठी या व्यक्तीनं आपलं रक्त दिलं आहे. हे रक्त कोरोनाव्हायरस असलेल्या रुग्णाला चढवण्यात आलं आहे. उपचाराची ही पद्धत 1918 साली स्पॅनिश फ्लूच्या वेळी वापरण्यात आली होती. हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे तरुण बळी, एकाच दिवसात घेतला दोघांचा जीव कोविड -19 आजारातून बरा झालेल्या व्यक्तीच्या प्लाझ्मामध्ये अँटिबॉडीज असतात, जे प्रतिकारक प्रणालीमार्फत व्हायरसवर हल्ला चढवण्यासाठी तयार होतात. असे प्लाझ्मा एका रुग्णाच्या शरीरात सोडल्यानंतर त्याच्यामध्येही या व्हायरसशी लडण्यासाठी अँटिबॉडीज मिळतील, अशी आशा वर्तवली जाते आहे. मेथोडिस्टस रिसर्च इन्स्टिट्युटचे डॉ. एरिक सलाचार यांनी सांगितलं की, 'कोनवालेस्सेंट सीरम थेरेपी एक महत्त्वपूर्ण उपचाराची पद्धत होऊ शकते. कारण कोरोनाग्रस्त रुग्णांची देखभाल करण्यासाठी आणखी खूप गोष्टींची गरज आहे. शिवाय क्लिनिकल चाचण्यांनाही वेळ लागणार आहे. आमच्याकडे इतका वेळ नाही. त्यामुळे या उपचाराची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे' कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेमध्ये 2 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ह्युस्टन मेथोडिस्टचे अध्यक्ष आणि सीईओ मार्क बूम यांनी सांगितलं की, एकंदर परिस्थिती पाहता असे प्रयत्न करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. जर ही थेरेपी या आजाराने पीडित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत मिळत असेल, तर खूप महत्त्वपूर्ण ठरेल' हे वाचा - लॉकडाऊन संपल्यानंतर 'कोरोना'च्या उद्रेकाची शक्यता, तज्ज्ञांनी दिली धोक्याची घंटा
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus

  पुढील बातम्या