‘हॅलो, मी कोरौनातून बोलतोय’ ऐकल्यावर नातेवाईकही फोन उचलेनात, ग्रामस्थांची व्यथा

या गावातील नागरिक हैराण झाले आहेत. कोरोनाच्या या कहरामुळे कोणी त्यांच्या गावात येतही नाही

या गावातील नागरिक हैराण झाले आहेत. कोरोनाच्या या कहरामुळे कोणी त्यांच्या गावात येतही नाही

  • Share this:
    सीतापूर (उत्तर प्रदेश), 29 मार्च : सध्या देशभरात कोरोनामुळे (Covid - 19) संकट उभं राहिलं असताना उत्तर प्रदेशातील एक गाव वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर या जिल्ह्यातील एका गावाचे नाव जीवघेण्या ‘कोरोना’ (Corona) या नावाशी मिळतेजुळते असल्याने या गावातील नागरिकांची पंचाईत झाली आहे. कोरौना (Korauna) गावात राहणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचा फैलाव होत असल्यापासून  आमच्यासोबत भेदभाव केला जात आहे. गावातील कोणीच घराबाहेर पडत नाही. सर्वांमध्येच भीतीचं वातावरण आहे. आम्ही कोरौना या गावातील असल्याचं सांगितलं तर आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे गाव असल्याचं लोकांच्या लक्षातच येत नाही. अनेकजण तर आमच्या फोनला उत्तरही देत नाही. आतापर्यंत देशात जवळपास 1000 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संबंधित - कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान पाहून जर्मनीतील मंत्र्यांची आत्महत्या मात्र या पार्श्वभूमीवर देशातील उत्तर प्रदेशातील कोरौना या गावातील नागरिकांना वेगळाच त्रास सहन करावा लागत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली. आता कोरोनाचं संकट टळळ्यानंतर या गावातील संकट टळेल की नाही हा प्रश्नचं आहे. यावरुन आपल्या लक्षात येऊन शकते की देशातील नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल किती भीती आहे. मात्र अशाप्रकारे केवळ नाव मिळतेजुळते असल्याने या गावातील नागरिकांसोबत अशा प्रकारची वागणूक करणे योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. या भेदभावाच्या वातावरणात कसं राहायचं हा येथील गावकऱ्यांसमोरील मोठा प्रश्न आहे. संबंधित - महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे तरुण बळी, एकाच दिवसात घेतला दोघांचा जीव
    First published: