Home /News /maharashtra /

काम बंद करण्याची धमकी देऊन बिल्डराला 30 लाखांना लुटले, आणखी मागितले 1 कोटी आणि...

काम बंद करण्याची धमकी देऊन बिल्डराला 30 लाखांना लुटले, आणखी मागितले 1 कोटी आणि...

तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल दीड कोटीची खंडणी मागण्यात आली होती. यापैकी 30 लाख रूपये घेऊनही पैशासाठी वारंवार धमकावले जात होते.

 अकोले, 15 फेब्रुवारी :  अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील अकोलेमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाला लाखो रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल दीड कोटीची खंडणी मागण्यात आली होती. यापैकी 30 लाख रूपये घेऊनही पैशासाठी वारंवार धमकावले जात होते. अखेर या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील लक्ष्मीकांत नाईकवाडी यांचे पुणे-अकोले-संगमनेर येथे सुरू असलेल्या प्रकल्पाविषयी वारंवार तक्रार अर्ज करुन ते माघारी घेण्यासाठी 55 लाख रुपये खंडणीची मागणी करुन त्यातील 30 लाख रुपये स्विकारुनही पुन्हा एक कोटी रूपयांची खंडणीची मागणी करत असल्या प्रकरणी शहरातील गणेश भागुजी कानवडे,सुभाष भागुजी कानवडे व मयूर सुभाष कानवडे ( रा.अकोले) यांच्याविरुद्ध अकोले पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 दिवसांच्या जुळ्या बहिणींना माकडांनी उचललं; नाल्यात फेकल्याने एकीचा मृत्यू अकोले पोलीस स्टेशनला लक्ष्मीकांत अंबादास नाईकवाडी यांनी फिर्याद देवून गुन्हा दाखल केला आहे. अकोले येथील मयुर सुभाष कानवडे आणि सुभाष भागुजी कानवडे यांनी बांधकाम प्रकल्पामध्ये वारंवार हस्तक्षेप करुन त्रास देणे तसंच ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. खोटे नाटे तक्रारी अर्ज करणे सुरू करून  दुसऱ्या जागेत अतिक्रमण केले आहे,अनियमित बांधकाम केले आहे, असे त्यांनी अर्ज केल्याने बांधकाम बंद करावे लागले. गणेश भागुजी कानवडे, मयुर सुभाष कानवडे यांनी कामात अडथळे आणले. त्या तिघांनीही माझ्याकडे तुम्ही 55 लाख दिले तर अर्ज मागे घेतो, असे सांगितले. त्यावर  बांधकाम प्रकल्प वरील तिन्ही लोकांच्या अर्जामुळे रखडल्यामुळे तसेच मला सदर प्रकल्पासाठी माझ्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने मी 47 लाख रुपये देण्यास तयार झालो. वरील मध्यस्ती लोकांनी देखील सदरची रक्कम कोणतेही कारण नसताना घेत असल्याने केलेले तक्रारी अर्ज मागे घ्यावे लागतील, असे सांगितल्याने व त्या गोष्टीस मयुर कानवडे व त्याचे चुलते तयार झाल्याने मी गेल्या वर्षभरात त्यांना 30 लाख रूपये दिले आहे.मात्र, उर्वरीत पैशासाठी धमकावणं आणि कामात अडथळे आणणं सुरूच आहे. आता त्यांनी एक कोटी रूपयांची खंडणी मागितलीय आणि मला बरबाद करण्याची धमकी दिली, असं तक्रारीत म्हटलं आहे. पेट्रोलच्या दरानं गाठलं शतक; संतापलेल्या रिचानं साधला मोदी समर्थकांवर निशाणा खंडणीद्वारे आधी 55 लाखांची मागणी करुन त्यातील 30लाख रु स्विकारले आणि नंतर 1 कोटी रुपयांची मागणी ते करत असल्याचे बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीत म्हटले असल्याने अकोले पोलीस स्टेशनला मयूर सुभाष कानवडे,गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे याच्याविरुद्ध भा.द.वी.कलम ३८४,३८५ अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ahmednagar, Crime, Financial fraud, Gujarat cm, Money, Money fraud

पुढील बातम्या