Home /News /entertainment /

पेट्रोलच्या दरानं गाठलं शतक; संतापलेल्या रिचानं साधला मोदी समर्थकांवर निशाणा

पेट्रोलच्या दरानं गाठलं शतक; संतापलेल्या रिचानं साधला मोदी समर्थकांवर निशाणा

सर्वसामान्य जनता सध्या इंधनाच्या वाढत्या दरामुळं त्रस्त आहे. या वाढत्या दरांवरुन अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) हिने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. किंमती वाढल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत तिनं आपला संताप व्यक्त केला आहे.

    मुंबई, 15 फेब्रुवारी : पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारानुसार इंधनाचे दर दररोज बदलत असतात. गेल्या काही काळात इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. आज मध्यप्रदेशात पेट्रोलच्या किंमतीनं शंभरी पार केली. राजधानी भोपाळमध्ये तर 100 रुपये 4 पैसे प्रती लिटर हा पेट्रोलचा दर आहे. (Petrol Disel Price Hikes) त्यामुळं सर्वसामान्य जनता सध्या इंधनाच्या वाढत्या दरामुळं त्रस्त आहे. या वाढत्या दरांवरुन अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) हिने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. किंमती वाढल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत तिनं आपला संताप व्यक्त केला आहे. “इंधनाचे दर वाढल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आसपास पाहा, महागाईमुळं त्रस्त असलेला कोणीही याविरोधात आवाज उठवणार नाही. हे दुदैवी लोक केवळ ट्विटरवरच आपला राग काढतील. राष्ट्रहिताच्या नावाखाली होणारा त्रास सहन करत राहतील. या सर्व मंडळींना इंधन शतकाच्या हार्दिक शुभेच्छा.” अशा आशयाचं ट्विट करुन रिचानं आपला राग व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत इंधर दरवाढीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अवश्य पाहा - दीपिकाची सटकली; शिव्या घालणाऱ्या ट्रोलर्सची केली बोलती बंद पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल डिझेलचे रोजचे दर एसएमएसच्या माध्यमातूनही जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑइल कंपनीचे ग्राहक आरएसपी (RSP) आणि आपल्या शहराचा पिनकोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक आरएसपी (RSP) हा मेसेज या नंबरवर 9223112222 आणि एचपीसीएलचे (HPCL) ग्राहक एचपी प्राईस (HP Price)असा संदेश 9222201122 या क्रमांकावर पाठवून एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर जाणून घेऊ शकतात.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Inflation, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Richa chadda

    पुढील बातम्या