मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक

कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशाचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.99 टक्के एवढा आहे. हे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील सर्वात पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 12 एप्रिल : भारतातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) पहिला रुग्ण (Patient Zero) केरळमध्ये (Keral) आढळला होता. 31 जानेवारी रोजी चीनमधील वुहानहून परत आलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनीची कोरोना (Covid - 19) टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

सुरुवातील भारतातील केरळ राज्य कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रथम क्रमांकावर होता. येथे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. पण आता केरळने आपल्या वाढत्या कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेला केरळ आता या यादीमध्ये सर्वात खाली आहे. त्यामुळे परदेशातही केरळने ज्या पद्धतीने कोरोनावर नियंत्रण आणलं त्याचं कौतुक केलं जात आहे.

अनेक आक्रमक उपाय अवलंबले

वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केरळ सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या लेखात असे म्हटले आहे की, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आक्रमक चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, शिजवलेले अन्न लोकापंर्यत पोहोचून कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे प्रयत्न केले आहेत. कोरोना प्रकरणं उघडकीस आल्यानंतर काही दिवसांतच केरळने संभाव्य संक्रमित रुग्णांपर्यंत  पोहोचण्यासाठी संपूर्ण योजना आखली होती.

30 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लावले कामाला

मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांना दररोज भेट देत होते. त्यांच्यावर बारीक नजर ठेवली जात होती. राज्यातील सुमारे 30 हजार परिचारिका या कामात व्यस्त आहेत. प्रत्येक परिचारिका आठवड्यातून सुमारे 200 अशा लोकांच्या घरी जाऊन विलगीकरणात ठेवलेल्यांना भेटत असतं. आता अशी स्थिती आहे की एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यात नवीन प्रकरणांची संख्या 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत केवळ 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर या रोगातून राज्य बरे होत आहे.

केरळला होता सर्वात मोठा धोका

विशेष म्हणजे कोरोनाचे वाईटरित्या पसरण्याचा धोका केरळवर  होता. कारण या राज्यात बहुधा दरवर्षी भारतातून सर्वाधिक पर्यटक येतात. दरवर्षी सुमारे 10 लाख पर्यटक या राज्याला भेट देतात. राज्यात सुमारे साडेतीन कोटी लोकसंख्या आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार जागरूक नसल्यास धोका जास्त होता. कोरोनाचा संसर्ग वाईट प्रकारे पसरू शकला असता.

2 लोकांसाठी 900 जणांना केलं क्वारंटाइन

राज्यातील तरुण मोठ्या संख्येने चीनमध्ये शिक्षण घेत आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने परदेशातून येणाऱ्यांची काटेकोर तपासणी सुरू केली. परंतु इतके कठोर स्क्रिनिंग असूनही चूक झाली होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात इटलीहून आलेल्या एका जोडप्याने आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी केली नव्हती.  त्यानंतर जेव्हा त्याचा शोध घेतला जाऊ शकला, तोपर्यंत त्याने अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. या जोडप्यामुळे सरकारने सुमारे 900 लोकांना क्वारंटाइन केले होते.

संबंधित -

अवघ्या 4 दिवसांत 80 जिल्ह्यांत पोहोचला कोरोना, अर्ध्या भारतात फैलाव

कोरोनाचा विळखा! राज्यात आज 22 जणं दगावले, एकूण रुग्णसंख्या 1982 वर

संपादन - मीनल गांगुर्डे

First published:

Tags: Coronavirus, Wuhan