Home /News /maharashtra /

सैन्यात जाण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं, नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सैन्यात जाण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं, नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

 वैद्यकीय तपासणीसाठी तो नांदेडला आला होता. पण मित्रासोबत पोहोण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.

वैद्यकीय तपासणीसाठी तो नांदेडला आला होता. पण मित्रासोबत पोहोण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.

वैद्यकीय तपासणीसाठी तो नांदेडला आला होता. पण मित्रासोबत पोहोण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.

नांदेड, 24 मे : सैन्य भरतीमध्ये  (Military recruitment) निवड झालेल्या एका तरुणाचा नांदेडमध्ये (nanded) गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा तरुण वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडमध्ये आला होता. पण मित्रासोबत पोहोण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  संतोष कदम (21 वर्षीय ) असं या तरुणाचं नाव आहे. संतोष कदमचं भारतीय सैन्यदलात निवड झाली होती. वैद्यकीय तपासणीसाठी तो नांदेडला आला होता. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात वैद्यकीय तपासणी पार पडली होती. तपासणी पूर्ण झाली होती त्यानंतर तो मित्रासोबत विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर दर्शनासाठी गेला होता. दुपारी संतोष आणि त्याचे मित्र दोन वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गोदावरी नदीपात्रात उतरले होते. पण पाण्यात पोहोत असताना खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे संतोषचा बुडून मृत्यू झाला. संतोषचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. मित्रांनी याची माहिती तातडीने पोलिसांना आणि त्याच्या कुटुंबीयांना दिली.  मयत संतोष कदम याचे चुलतकाका सुरेश शंकर कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. (IPL: ...तर मला फोन कर, मुंबईच्या खेळाडूला निरोप देताना रोहितने दाखवलं मोठं मन!) त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली.  मयत संतोष कदम यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.  या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष कदमच्या मृत्यूमुळे गावी शोककळा पसरली आहे. बंधाऱ्याच्या चारीसाठी खोदलेल्या खड्यात पडून शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू दरम्यान, बंधाऱ्याच्या चारीसाठी खोदलेल्या खड्यात पडून शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव शहराजवळील केसापुरी कॅम्प घडली. शेख सद्दाम (15) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचं नाव आहे. सद्दामच्या मृत्यूला पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई केलेली अशी नातेवाईक यांनी मागणी केली. (Optical Illusion:रंग बदलणाऱ्या हुडीने चक्रावले नेटकरी, तुम्हाला हा VIDEO समजला?) माजलगाव तालुक्यातील लोणी सावंगी तेथे साडेतीनशे कोटी खर्च करून बंधाऱ्यातून गोदावरी नदीला पावसाळ्यात येणारे पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या चारी कालवा खोदण्यात येत आहे. केसापुरी कॅम्प वसाहत येथे महिन्याभरापूर्वी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. यात लिकेज झालेल्या पाइपलाईनचे पाणी जमा झाल्याने हा भरला आहे. सोमवारी शेख सद्दाम शेख बिलाल ( १६ ) व त्याचा छोटा भाऊ मुजाहेद ( १२ ) व तेरा वर्षांचा मुलगा असे तिघे खड्डयाजवळ खोदून फेकलेल्या मुरुमावरून जात होते. यावेळी शेख सद्दाम याचा पाय मुरुमावरून घसरल्याने तो खड्डयात जाऊन पडला. मुलांनी आरडाओरड केल्याने लोकांनी खड्डयात उतरून बुडालेल्या सद्दामला बाहेर काढले. परंतु त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या