मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली. सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेली मुंबई या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने एका मोसमात 10 मॅच गमावल्या. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅटही संपूर्ण हंगामात शांत राहिली. रोहितला 15 सिझनमध्ये पहिल्यांदाच एकही अर्धशतक करता आलेलं नाही. रोहित शर्माने संपूर्ण मोसमात संघर्ष केला असला तरी तो सर्वोत्तम कर्णधार का आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू बायो-बबलमधून बाहेर पडत होते, तेव्हा रोहितने सगळ्यांना निरोप दिला. मुंबईचा युवा खेळाडू रमणदीप सिंगला (Ramandeep Singh) निरोप देताना रोहितने मोठं मन दाखवलं. मुंबई इंडियन्ससोबत टीम इंडियाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा त्याच्या खेळाडूंना कायमच मदत करण्यासाठी तयार असतो, हे बरेच वेळा दिसून आलं आहे. रमणदीप सिंगलाही याचा अनुभव आला. काळजी घे मित्रा, कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर, असं रोहित शर्मा रमणदीप सिंगला म्हणाला.
Rollercoaster of emotions, group photo clicks and final goodbyes 🥺
— Mumbai Indians (@mipaltan) May 23, 2022
Paltan, presenting to you the final episode of 𝐌𝐈 𝐃𝐢𝐚𝐫𝐲 from this season 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/4wYMYEhidf
रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल 2022 मध्ये रमणदीप सिंगने 4 मॅच खेळल्या, यात त्याने 6.25 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग करत 4 विकेट घेतल्या, तसंच बॅटिंगमध्ये त्याने 34 रन केल्या.