चंद्रपूर, 25 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचं दिसतं. महिला अत्याचारापासून ते हाणामारी, खूप, आत्महत्या आणि सध्या सुरू असलेला हिंसाचार या सगळ्यामुळे देश हादरला आहे. अशात मानवी स्वभाव अतिशय क्रूर आणि रागीट झाला आहे. याचं एक धक्कादायक उदाहरण चंद्रपूरमध्ये समोर आलं आहे. मटण पळवून नेल्यामुळे एका खाटकाने चक्क कुत्र्यावर चाकू हल्ला केल्याचं समोर आलं आहे. ही बातमी आणि कुत्र्यावर हल्ला झाल्याचा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या काळजात चर्रर होईल. हल्ली अगदी साध्या आणि शुल्लक कारणावरून मनुष्य अगदी टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहे. या घटनेमुळे मानवी स्वभाव कोणत्या दिशेने प्रगती करत आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. मटण पळवलं म्हणून खाटकाने कुत्र्यावर चाकू हल्ला केला. वरोरा शहरातील ही धक्कादायक घटना आहे. आनंदवन परिसरात असलेल्या मटणाच्या दुकानातून कुत्र्याने मटण पळविले. म्हणून खाटकाने कुत्र्याच्या पाठीत चाकू खुसपला. ही बातमी वाचल्यानंतर प्राणी प्रेमींमध्ये दुखाचं वातावरण आहे. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. लोक त्याला घरातला एक सदस्य म्हणून पाळतात. कुत्र्याला मानसाचा सगळ्यात जवळचा मित्रसुद्धा म्हणतात. अशात फक्त मटण कुत्र्याने पळवल्यामुळे त्याच्यावर हल्ला करणं म्हणजे निव्वळ मुर्खपणाचं असल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. प्राणी मित्रांनी सध्या कुत्र्यावर उपचार सुरू केले असून आरोपी विरोधात आज पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्याच्या, महिला अत्याचाराच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहे. देशात सगळीकडे तणावाचं वातावरण आहे. अशात तरुणाईने आणि नव्या पीढीने काय शिकावं आणि काय बोध घ्यावा हा मोठा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.