मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनंजय मुंडे झाले ‘शिवकन्ये’चे बाप, रेल्वे ट्रॅकवर सोडलेल्या मुलीचं स्वीकारलं पालकत्व

धनंजय मुंडे झाले ‘शिवकन्ये’चे बाप, रेल्वे ट्रॅकवर सोडलेल्या मुलीचं स्वीकारलं पालकत्व

काल कोणीतरी परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी स्त्री भृण टाकून पळ काढला होता

काल कोणीतरी परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी स्त्री भृण टाकून पळ काढला होता

काल कोणीतरी परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी स्त्री भृण टाकून पळ काढला होता

  • Published by:  Meenal Gangurde

बीड, 25 फेब्रुवारी : महाराष्ट्रात अद्यापही स्त्री भृण हत्येसारखे प्रकार सुरू आहेत. आजही देशात मुलगी जन्माला आली म्हणून नकोशी म्हणत तिला अनाथ आश्रम वा कचऱ्याच्या पेटीजवळ सोडून दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. रेल्वे ट्रॅकजवळ काटेरी झुडुपात कोणीतरी स्त्रीभृण टाकून गेले होते. याबाबत माहिती मिळताच धनंजय मुंडेनी त्या लेकीचं पालकत्व स्वीकारलं. इतकच नव्हे तर त्यांनी त्या लेकीवरील उपचार, तिचे शिक्षण, लग्नासहित तिची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. यासाठी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी मुंडेंना सहकार्य केल्याचे सांगण्यात आले. काल काटेरी झुडपात नवजात अर्भकाला टाकून माता पिता फरार झाल्याची धक्कादायक घटना परळी शहरात घडली होती. परळी शहरातील बरकतनगर परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी  सायंकाळच्या सुमारास एक दिवसाचे स्त्रीभृण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. बरकतनगर परिसरात रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकाच्या दृष्टीस हे अर्भक पडले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी अर्भक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असताना स्त्रीभृण असून काही तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. फेकल्यामुळे बाळाच्या अंगात काटे रुतले होते. या घटनेमुळे परळी शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

धनंजय मुंडे यांनी संवेदनशीलता दाखवित या मुलींचा सांभाळ करण्याची तयारी दाखविली. सध्या ती मुलगी सुखरुप असून रुग्णालयात पुढील उपचार घेत आहे. धनंजय मुंडेनी त्या मुलीचे नाव शिवकन्या असं ठेवलं आहे. समाज माध्यमांवर त्यांनी उचलेल्या या पावलाचे कौतुक केले जात आहे.

First published:

Tags: Dhanjay munde, Female foeticide case