मुलीवरून भांडण! तरुणानं पेट्रोल ओतून वडिलांना जिवंत जाळलं, बदलापूर जवळील घटना

मुलीवरून भांडण! तरुणानं पेट्रोल ओतून वडिलांना जिवंत जाळलं, बदलापूर जवळील घटना

'तू माझ्याकडे रागानं का बघते, असे जाब विचारत झाली होती मुलीला शिवीगाळ...

  • Share this:

अंबरनाथ, 17 सप्टेंबर: मुलीवरून झालेल्या भांडणातून पेट्रोल ओतून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बदलापूर जवळील वांगणी गावाच्या डोणेवाडी भागात ही घटना घडली आहे. चंद्रकांत पवार (वय-48) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निखिल गुरव याला अटक केली आहे.

हेही वाचा...धक्कादायक! मुंबईत कोविड सेंटरमध्ये घडलं आणखी एक घृणास्पद कृत्य...

आरोपीनं घरात घुसून चंद्रकांत पवार यांच्या अंगावर पेट्रोल ओतून सिगारेट पेटवण्याच्या लायटरनं आग लावली होती. यात गंभीर होरपळलेल्या अवस्थेत चंद्रकांत पवार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

मिळालेली माहिती अशी की, अंबरनाथ तालुक्यातील डोणेवाडीतील विश्वनाथ अपार्टमेंटच्या बी विंग फ्लॅट क्रमांक 201 मध्ये चंद्रकांत पवार हे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. 10 दिवसांपूर्वी पवार यांची मुलगी वीज बिल आणण्यासाठी या अपार्टमेंटच्या सी विंगमध्ये गेली होती. यावेळी निखिल गुरव याच्या आईसोबत तिची बाचाबाची झाली होती.

'तू माझ्याकडे रागानं का बघते, असे जाब विचारत निखिलच्या आईनं चंद्रकांत पवार यांच्या मुलीला शिवीगाळ केली होती. दरम्यान, हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्यात आलं होतं. मात्र 10 सप्टेंबरला आरोपी निखिल गुरव हा दारू पिऊन पवार यांच्या घरी आला आणि भांडण करू लागला. रागाच्या भरात निखिल यानं सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल थेट चंद्रकांत पवार यांच्या अंगावर ओतलं आणि लायटरने त्यांना पेटवून दिलं. यात चंद्रकांत पवार गंभीररित्या भाजले गेले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान झालेल्या घटनेबाबत पोलिसांनी चंद्रकांत पवार यांचा जबाबही नोंदवला होता. अखेल बुधवारी मुंबईत उपचारादरम्यान चंद्रकांत पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

असा शिक्षक होणे नाही! कोरोना महासाथीत विद्यार्थ्यांच्या दारासमोरचं आणली शाळा

या प्रकरणी कुळगांव बदलापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना आरोपी निखिल गुरव याला अटक केली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.  दरम्यान, या प्रकारामुळे डोणेवाडी भागात तणावाचे वातावरण पसरले होतं. या प्रकरणी अॅट्रोसिटीअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गायकवाड आणि संदीप निगडे करत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 17, 2020, 7:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या