मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! मुंबईत कोविड सेंटरमध्ये घडलं आणखी एक घृणास्पद कृत्य...

धक्कादायक! मुंबईत कोविड सेंटरमध्ये घडलं आणखी एक घृणास्पद कृत्य...

कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर...

कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर...

कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर...

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 15 सप्टेंबर: ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर परिसरातील एका कोविड सेंटरमध्ये एका विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना अशाच एका घटनेनं मुंबई हादरली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हेही वाचा...धक्कादायक! माथेफिरू प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीवरच झाडली गोळी, अन्... या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपेश साळवे याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी कोविड सेंटरमध्ये सॅनिटायझरचं काम करतो. मिळालेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन तरुणी मानखुर्द येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आरोपी दीपेश साळवे यान अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या सुमारास विनयभंग केला. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा कॉन्ट्रॅक्टरने नियुक्त केलेला कर्मचारी असून पोस्को कायदा आणि विवीध कलमांच्या अंतर्गत त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोविड सेंटरमध्ये विवाहितेवर बलात्कार... दरम्यान, राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये सोईसुविधा देण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली. ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एका 27 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. मीरा रोड परिसरात हे कोविड सेंटर आहे. पीडित महिलेला आपल्या 10 महिन्याच्या मुलीसोबत एका खोलीत क्वारंटाइन करण्यात आले होते. याच सेंटरमध्ये तिच्या नात्यातील एक व्यक्तीला भेटायला गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी हा पीडित महिलेला गरम पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत येत होता. काही दिवसांनी या नराधमाने लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केले. या आरोपीने जूनच्या पहिल्या आठवड्यात या आरोपीने तीन वेळी पीडितेवर अत्याचार केला होता, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी दिली. आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पीडित महिलेनं तेव्हा तक्रार दाखल केली नव्हती. पण, अखेर संतापाचा उद्रेक झाल्यामुळे या महिलेनं शनिवारी नवघर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे. हेही वाचा...महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का? दरम्यान, राज्यात कोविड सेंटरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या बलात्कार आणि अत्याचाराविरोधात सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
First published:

पुढील बातम्या