छत्तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्यात (Chhattisgarh's Korea district) एक सरकारी शाळेचे शिक्षक (government school teacher) मुलांना शिकवण्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. सरकारी शाळेत शिकवणारे शिक्षक रुद्र राणा (Rudra Rana) यांनी अपल्या बाइकवर ब्लॅकबोर्ड म्हणजेच फळा बांधून ठेवला आहे आणि ते कोरोना महासाथीमुळे जागोजागो जाऊन मोहल्ला क्लासेसच्या माध्यमातून मुलांना शिकवत आहेत.
ते पुढे म्हणाले की, येथील अत्यंत कमी मुलांना ऑनलाइन क्लासेसला हजेरी लावता येते. अशात आम्ही मोहल्ला क्लास सुरू केला. अशातही आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो. त्यांच्या घरासमोर येऊन मी त्यांना शिकवतो. माझ्यासोबतच ब्लॅकबोर्ड, पुस्तकं आणि प्लेकार्डसदेखील असतात. मी घंटा वाजवतो आणि मुलं सामान्य शाळेप्रमाणे हजर होतात. विद्यार्थी सुरुवातीची प्रार्थना करतात, त्यानंतर अभ्यासक्रमानुसार क्लास सुरू केला जातो.