Home /News /maharashtra /

गावी आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी असं केलं क्वारंटाइन की, कुणालाही येईल राग!

गावी आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी असं केलं क्वारंटाइन की, कुणालाही येईल राग!

दरम्यान, आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या 97.7 लाख प्रकरणं समोर आली आहेत. तर जगभरात कोरोना विषाणूमुळे 4.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या 97.7 लाख प्रकरणं समोर आली आहेत. तर जगभरात कोरोना विषाणूमुळे 4.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

एवढंच नाहीतर बाहेरील कोणत्याही व्यक्तीला गावात घ्यायचं नाही असा गावाचा ठराव झाल्याने वाडीतील लोकांनी या तरुणाला गावाबाहेर किंवा गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला.

दापोली, 18 मे : रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी कुंभारवाडा येथील तरुणाला चक्क छोट्या रिक्षा टेम्पोत क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. गेली चार दिवस हा रिक्षा टेम्पो त्याच्यासाठी घरं बनलं आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाइन करण्याचे आदेश आहे पण असं असलं तरी कोरोनाच्या नावाखाली अनेकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक तरुण खेड लोटे येथील घरडा केमिकल कंपनीत कामाला आहे. मात्र, सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 14 मे रोजी त्याने आपल्या मुळगावी केळशी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाहेरील कोणत्याही व्यक्तीला गावात घ्यायचं नाही असा गावाचा ठराव झाल्याने वाडीतील लोकांनी त्याला गावाबाहेर किंवा गाव सोडून पुन्हा खेडला जाण्याचा सल्ला दिला. हेही वाचा - 'आदित्यजी आता निर्णय तुमच्या हातात', गणेशोत्सवासंदर्भात उचलणार का मोठं पाऊल? या तरुणाने गावात येण्यापूर्वी रीतसर आरोग्य तपासणी करून घेतली आहे. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे. त्याला 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, असे असताना सुद्धा केवळवाडीची बैठक झाली व त्या बैठकीत बाहेरच्या व्यक्तीला गावात घ्यायचे नाही हा नियम झाल्यानेच आम्ही त्याला घरी ठेवले नाही, असं त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. मुंबई - पुणे रेड झोन विभागातून गावी येणाऱ्या लोकांना गावागावात शाळा , समाज मंदिर किंवा  त्यांच्या घरी होम क्वारंटाइन करण्यात येत आहे.  त्यामुळे या तरुणाची  गावातल्या शाळेत किंवा एखाद्या समाज मंदिरात राहण्याची व्यवस्था करण्याची गरज असताना तसे काही झाले नाही. लॉकडाउनमुळे त्याचे आई-वडिल सुद्धा मुंबईत अडकले आहेत. शेवटी जवळच्या नातेवाई मंडळीने नाईलाजाने त्याला रिक्षा टेम्पोत शेतात ठेवले आहे. या ठिकाणी ना लाईट, ना पाणी, ना टॉयलेट, ना बाथरूम  आहे. अशा कठीण परिस्थितीत एकटा तरुण गावा बाहेर  जंगलातील शेतात गावकऱ्यांनी दिलेली शिक्षा भोगत आहे. पण त्याचा गुन्हा काय तो तालुक्या बाहेरून आला आहे. आपल्याच जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे    वागणूक देणे कितपत योग्य आहे. हेही वाचा - या छत्रीत दडलंय काय? ऊन-पावसासोबत आता पोलिसांचा मोबाईलही चार्ज होणार जंगलातील शेतात रिक्षा टेम्पोत या तरुणाला ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अनेक लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसंच केळशी गावातील प्रतिष्ठित लोकांनी सुद्धा याबाबत कसलीही कल्पना नसल्याचं सांगितलं. मग त्या तरुणाला कोणी गावाबाहेर काढले व त्या रिक्षा टेम्पोत राहण्याची वेळ त्याच्यावर कोणी आणली याबाबत अनेक चर्चा गावात रंगू लागल्या आहेत. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केला आहे. याच भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याची गाठ भेट घेऊन जर त्याची वाडी किंवा नातेवाईक त्याला घरी ठेवण्यास असमर्थ असतील तर आम्ही त्याची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू मात्र, अशा पद्धतीने  वागणूक कोणीही देऊ नये. अशी विनंती सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Dapoli, Ratnagiri

पुढील बातम्या