• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 'आदित्यजी आता निर्णय तुमच्या हातात', गणेशोत्सवासंदर्भात उचलणार का मोठं पाऊल?

'आदित्यजी आता निर्णय तुमच्या हातात', गणेशोत्सवासंदर्भात उचलणार का मोठं पाऊल?

विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. त्यात गणेशोत्सवासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची त्यांनी विनंती केली आहे.

  • Share this:
मुंबई, 18 मे : कोरोनाच्या हाहाकारामुळे जगभरातील अनेक देशांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या व्हायरसच्या प्रादुर्भामुळे अनेक मोठ्या स्पर्धा, सण-उत्सव रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जाणारा गणेशोत्सवदेखील यंदा अटींसह साजरा होणार आहे. पण यात पर्यावरणासाठी खारीचा वाटा उचलणं महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. ‘पीओपी’च्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती आणि त्यांच्या उंचीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच निर्बंध घातले आहेत. तसेच मूर्तीची घडणं आणि विसर्जन याबाबतही उत्सव समित्यांना आणि मूर्तिकारांना सूचना करण्यात आल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रात आणि देश विदेशात वर्षानुवर्षे साजरा होणारा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे मराठी व प्रामुख्याने हिंदू अस्मिता, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. गणेशोत्सव ही महाराष्ट्राची ओळख आहे. लाखो लोक या उत्सवात एकत्र येतात. जगात साजऱ्या होणाऱ्या मोठ्या सार्वजनिक उत्सवांपैकी गणेशोत्सव हा एक उत्सव आहे. या मंगलमय उत्सवाला यापुढे कोणत्याही प्रदूषणाचे गालबोट लागू नये म्हणून व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्याची, त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याची गरज गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. लॉकडाउन 4.0मध्ये देशात 12 तास असणार कर्फ्यू, अशा आहेत नव्या अटी गणेशोत्सवामधील पावित्र्य, मांगल्य आपण प्रत्येकाने जपले पाहिजे आणि हा उत्सव पूर्णपणे पर्यावरण पूरक, पर्यावरणाचे संरक्षण करणारा बनला पाहिजे. आपल्याकडील गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज असून यंदापासून राज्य सरकारने त्यासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यावे अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी पत्रातून केली आहे. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर लोकांना पर्यावरणाचे महत्व अधिक गंभीरतेने समजले आहे. देशात जी टाळेबंदी सुरु आहे त्यामुळे सर्वच प्रदूषण कमी झाल्याचे दिसत आहे. मुंबईत पाणी स्वच्छ झाले आहे , समुद्र किनारी डॉल्फिन सारखे मासे येत आहेत. अनेक ठिकाणी पक्ष्यांचे न ऐकू येणारे आवाज ऐकू येत आहेत. शहरातील हवा मोठ्याप्रमाणात स्वच्छ झाली आहे आणि त्यामुळे इतर आजरांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रदूषण कमी झाल्याने शुद्ध वातावरण मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता अनुभवत आहे. हेच वातावरण कायम ठेवायचे असेल तर आपल्याला आणखी काही निर्णय घ्यावे लागतील. आपण कोणत्याही कामाची सुरुवात गणरायाला वंदन करून करतो. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी, गणेशोत्सवापासून 'पर्यावरण पूरक उत्सवा'ची सुरुवात आपण करावी असं त्यांनी म्हटलं आहे. एकाच कुटुंबातील 6 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू, लहान बाळासह अनेकजण अडकले या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून महाराष्ट्र राज्यात फक्त शाडू मातीपासून आणि कागदी लगद्यापासून गणेश मूर्ती बनवल्या जाव्यात , याच मूर्तींचा वापर 100 टक्के व्हायला हवा. ‘पीओपी’च्या मूर्तीवर पूर्णपणे बंदी घालावी. त्यातही ‘पीओपी’च्या मूर्ती कुणी बनवल्या असतील तर त्या मूर्ती राज्य शासनाने ताब्यात घेऊन त्या मुर्तीकाराना किंवा व्यावसायिकांना शासनाने त्यासाठी भरपाई द्यावी. सरकारने हा निर्णय घेतल्यास सुरुवातीला अनेक गणेशोत्सव मंडळे या निर्णयाला विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हा निर्णय व्यापक पर्यावरण तसेच जनतेच्या हितासाठी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्णयाला विरोध झाला तरी चालेल पण येणाऱ्या पिढीसाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याबाबत यावर्षीपासून अंमलबजावणी व्हायलाच हवी. ज्या मंडळांना उत्सव भव्य प्रमाणात करायचा असेल त्यांनी मूर्तीच्या उंचीपेक्षा सजावट म्हणजेच 'डोकोरेशन'वर भर द्यावा असं मला वाटतं असं सरनाईक म्हणाले. काही तासांतच AMPHAN चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, ओडिशा आणि बंगाल हाय अलर्टवर 2020पासून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवावी! राज्य सरकारने एक मार्गदर्शक नियमावली , सूचना व याबाबत स्वतंत्र शासन निर्णय जारी करावा म्हणजे आत्तापासून भाविक त्याबाबत पूर्णपणे तयारी करू शकतील. पर्यावरणपूरक गणेश उत्सवाबरोबरच नवरात्र उत्सवही याच पद्धतीने साजरा व्हावा. कागदाचा लगदा अथवा शाडू मातीच्या मूर्तीचा पर्याय यंदा भाविकांसमोर ठेवावा. या वर्षीपासून कागद्याच्या लगद्यापासून मोठ्या मूर्ती आणि शाडू मातीच्या छोट्या मूर्तींना प्राधान्य देण्याबाबत, आपण निर्णय घ्यायला हवा. प्रताप सरनाईक यांनी पत्रात पुढं म्हटलं की, 'आपण पर्यावरण खात्याचे मंत्री झाल्यापासून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. पर्यावरण प्रेमी म्हणून आपली ओळख आहे. आज पर्यावरणाविषयी लोक अधिक सजग झाले असून पर्यावरण पूरक प्रत्येक गोष्ट व्हायला हवी असा आग्रह लोक धरीत आहेत. ' बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO आपली प्रत्येकाची जीवनशैली ही पर्यावरण पूरक आपण बनवत आहोत. गेल्या काही वर्षात अनेक भाविक हे 'इको फ्रेंडली' गणेशोत्सवाकडे वळले आहेत. आता प्रत्येक भाविकाने त्याकडे वळावे म्हणून आपण एकत्रितरित्या तसे प्रयत्न करायला हवेत. पर्यावरणपूरक उत्सव ही काळाची गरज आहे. यावर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव त्यापद्धतीने साजरा व्हायला हवा' संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published: