Home /News /maharashtra /

मृत्यूचा सापळा! 100 फूट उंच पूलावरून कोसळला ट्रक, चालक जागेवर ठार

मृत्यूचा सापळा! 100 फूट उंच पूलावरून कोसळला ट्रक, चालक जागेवर ठार

अकोल्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नदीचा पूल खड्ड्यामुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

अकोला, 18 डिसेंबर: अकोल्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नदीचा पूल खड्ड्यामुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नदी पात्रात ट्रक कोसळून चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान ही भीषण अपघात झाला. 100 फूट उंच वरून ट्रक नदी पात्रात कोसळल्यामुळे चक्काचूर झाला आहे. साहेब खा युसुफ खा असं अपघातातील मृत व्यक्तीचं नाव आहे. तो ट्रक चालक असल्याचं समजतं. हेही वाचा...माझ्या दोन मुलांना तुमच्या मुलांप्रमाणे सांभाळा, असं म्हणत शेतकऱ्यानं संपवलं पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्तीजापूरकडून अकोल्याकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. 48 ए .जी.1465) मालवाहू ट्रक कोळसा वाहून नेत होता. काटेपूर्णा नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना महामार्गावरील पडलेले खड्डे चुकवताना चालकाचा वाहनावरीत नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट 100 फूटावरून खाली कोसळला. ट्रक लोडेड असल्यानं या अपघातातील त्याचा पुरता चुराडा झाला आहे. पहाटे धुके असल्यानं सदर वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, मृत चालक साहेब खा युसुफ खा हा पालघर (मुंबई) येथील रहिवासी असल्याचं समजतं. चालकाचा ट्रकखाली दबून जागेवरच मृत्यू झाला. तर क्लीनर औरंगजेब खा हलील खा हा ट्रकमध्ये अडकला होता. हेही वाचा...आपला पगार किती, आपण बोलता किती, भाजपच्या आमदारांचा संजय राऊतांना टोमणा या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे योगेश काटकर धनसिंग राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या औरंगजेब यास काटेपुर्णा येथील आपत्कालीन पथकाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. त्या उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास बोरगाव पोलीस करीत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Akola, Maharashtra, Road accident

पुढील बातम्या