Home /News /maharashtra /

माझ्या दोन मुलांना तुमच्या मुलांप्रमाणे सांभाळा, असं चिठ्ठीत लिहून शेतकऱ्यानं स्वत: ला संपवलं

माझ्या दोन मुलांना तुमच्या मुलांप्रमाणे सांभाळा, असं चिठ्ठीत लिहून शेतकऱ्यानं स्वत: ला संपवलं

'मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो तर प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा, मी जात आहे

बीड, 18 डिसेंबर: शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यानं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन येथील धक्कादायक घटना घडली आहे. बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. 'मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो तर प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा, मी जात आहे मला माफ करा.' असं बाळासाहेब मस्के यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. हेही वाचा...विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा, आशिष शेलारांची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका पोखरा योजना अंतर्गत घेतलेल्या लाभाचे पैसे आठ महिने झाले मिळाले नाहीत. शासकीय योजनेतील शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी पैसे मिळाले नाहीत. गोड्या पाण्यातील मत्स्य पालन केले त्याच्या देखील अनुदान मिळाले नाही. यासाठी कर्ज काढलं. मात्र, सरकारी निधी मिळाला नाही. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे, असं या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिलं आहे. 'प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा मी जात आहे मला माफ करा,' असं आपल्या भावांना उद्देशून बाळासाहेब मस्के या शेतकऱ्यानं चिठ्ठीत म्हटलं आहे. या घटनेने बीड जिल्हा हळहळ व्यक्त केली जात आहे.  शासकीय योजनांचा लाभ फक्त धनदांडग्यांना मिळतो का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. शेतकऱ्याच्या योजनेचे पैसे वेळेत न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. त्याचबरोबर  या घटनेमुळे शासकीय योजनांचा गाजावाजा करून त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळतो का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळ येथे नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं. आनंद गोविंदराव भावले असं शेतकऱ्याचं नाव होतं. हेही वाचा...धक्कादायक! पत्नीची हत्या करुन माजी पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यात बँकेचं कर्ज आणि उसनवारीनं घेतलेलं कर्ज देता न आल्यानं आनंद भावले यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंद भावले यांच्यावर एका राष्ट्रीयकृत बँकेच कर्ज होतं. त्यांच्या कर्जाचं हप्ते थकले होते. अतिवृष्टीमुळे शेती पीकाचं मोठं नुकसान झालं. त्यात सरकारी मदत मिळाली नाही, कर्ज फेडायचं कसं? याच विवंचनेत ते होते, अशी माहिती मिळाली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या