जालना, 10 जानेवारी : राज्यात कोरोनाबाधित (maharashtra corona cases) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण असून लॉकडाऊनची (lockdown) शक्यता वर्तवली जात आहे. पण कोरोनाची तिसऱ्या लाटेला ( third wave of Corona) आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील' असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी व्यक्त केला आहे.
आज राजेश टोपे हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला.
'सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे' असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
'राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाच पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे' असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.
(IND vs SA : ताकदच झाली टीम इंडियाची कमजोरी, बुमराहमुळे विराट टेन्शनमध्ये!)a. 'जान है तो जहान है' असं सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजे पण काळजी घेणंही महत्वाचं आहे असं म्हणत टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला उत्तरं दिलं.
आज मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती,सद्य उपलब्ध असलेली साधन सामुग्री याबाबत चर्चा झाली असून ECRP 2 चा निधी खर्च करण्याबाबत चर्चा झाली असून आता निधी खर्च करण्याला वेग येईल' असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.
(तज्ज्ञांच्या मते टॉमेटो फळ पण तरी भाजीतच होते त्याची गणती; कारण आहे खास)
'राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट दुरुस्त करून घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहे. बूस्टर डोस, लहान मुलांना लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. 1लाख 54 हजार ऑक्सिजन बेड पैकी 5 हजार 400 बेड दिले गेलेलं आहे. हे जे प्रमाण आहे यावरून स्पष्ट होते की, आपल्या इन्फ्रास्ट्रकचर वर काहीच ताण आलेला नाही, ही बाब केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली, असंही टोपे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajesh tope