जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तज्ज्ञांच्या मते टॉमेटो फळ पण तरी भाजीतच होते त्याची गणना; कारण आहे खास

तज्ज्ञांच्या मते टॉमेटो फळ पण तरी भाजीतच होते त्याची गणना; कारण आहे खास

1. टोमॅटो फायदेशीर
उन्हाळ्यापासून आरोग्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटो नियमित खायला हवा. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.

1. टोमॅटो फायदेशीर उन्हाळ्यापासून आरोग्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटो नियमित खायला हवा. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.

शास्त्रीय तर्कांचा आधार घेतल्यास टोमॅटो फळ असल्याचं सिद्ध होतं. मात्र, तरीदेखील टोमॅटोचा वापर फळ म्हणून नाही तर एक भाजी म्हणून केला जातो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 जानेवारी : ‘पृथ्वीवर अंड अगोदर आलं की कोंबडी?’, हा प्रश्न जवळपास प्रत्येकानं कधीना कधी ऐकला असेल. या प्रश्नाच्या उत्तराबाबत आन्थ्रोपोलॉजिस्टपासून (Anthropologist) ते ओर्निथोलॉजिस्टपर्यंत (ornithologist) (पक्ष्यांवर संशोधन करणारे तज्ज्ञ) अनेकांमध्ये मतभेद आहेत. गेल्या कित्येक शतकांपासून हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अंड्यासारखाच आणखी एक खाण्याचा पदार्थ आहे, जो नेमका भाजी (Vegetable) आहे की फळ (Fruit), याबाबत एकवाक्यता नाही. तो म्हणजे ‘टोमॅटो’ (Tomato). अंड्याप्रमाणे टोमॅटोसुद्धा शास्त्रज्ञांमधील वादाचा मुद्दा ठरलेला आहे. टोमॅटोबाबत अनेक रिसर्च झाले आहेत. शास्त्रज्ञांनी आपापल्या तर्कांनुसार त्याचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत. परंतु टोमॅटो भाजी आहे की फळं? हे वर्गीकरण (Classification) करण्यात त्यांच्यामध्ये नेहमीच मतभेद राहिले आहेत. काही शास्त्रज्ञांनी टोमॅटोला फळ म्हटलं आहे तर काहींनी भाजी. गुणवत्तेचा विचार केला तर, टोमॅटोच्या अंगी फळांचे सर्व गुणधर्म आढळतात. मात्र, भाजीपाल्यांमध्ये त्याचा समावेश होण्याचीही काही कारणं आहेत. टोमॅटोच्या गुणवत्तेच्या आधारावर ऑक्सफर्ड डिक्शनरीनं (Oxford Dictionary) त्याचा समावेश फळांच्या श्रेणीमध्ये केला आहे. डिक्शनरीनुसार, टोमॅटो हे एक मऊ लाल रसाळ फळ आहे. परंतु, ते प्रामुख्यानं भाजी म्हणून शिजवून किंवा कच्चं खाल्लं जातं. याशिवाय केंब्रिज डिक्शनरीमध्येसुद्धा (Cambridge Dictionary) टोमॅटोला फळाचा दर्जा दिलेला आहे. केंब्रिजनुसार टोमॅटो हे, अनेक बिया असलेलं लाल गोलाकार फळ आहे.

    हे वाचा -  साध्या Cold drink मुळेही होऊ शकतो कॅन्सर; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

    एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या (Encyclopedia Britannica) अहवालानुसार टोमॅटो फळच आहे. शास्त्रीय अभ्यासाचा आधार घेतल्यास कुठलंही फळ हे फुलांच्या अंडाशयातून (Flower ovary) विकसित होतं आणि त्यामध्ये अनेक बिया (Seeds) आढळतात. टोमॅटोचा जन्मही अशाच पद्धतीनं होतो. याशिवाय फळामध्ये असलेली आंबड-गोड चव आणि फायबर हे दोन्ही घटक टोमॅटोमध्ये आढळतात. शास्त्रीय तर्कांचा आधार घेतल्यास टोमॅटो फळ असल्याचं सिद्ध होतं. मात्र, तरीदेखील टोमॅटोचा वापर फळ म्हणून नाही तर एक भाजी म्हणून केला जातो. पाकशास्त्रानुसार (Culinary Science), जेवणामध्ये फळांचा वापर ‘डेझर्ट’ (desert) म्हणून तर, भाज्यांचा वापर ‘मेन कोर्स’ (Main course) म्हणून केला जातो. जगभरात टोमॅटोचा मेन कोर्समध्येच समावेश केला जातो. भाज्यांच्या सॅलेडमध्येही (Salad) त्याचा समावेश केला जातो. या तर्कानुसार टोमॅटोचा समावेश भाज्यांमध्ये होतो.

    हे वाचा -  हंगामी सर्दी-तापातून लगेच व्हाल रिकव्हर; हा आयुर्वेदिक काढा ठरेल गुणकारी

    टोमॅटो हे फळ आहे की भाजी हा अजूनही वादाचा मुद्दा आहे. मात्र, टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वं आढळतात आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही ते फळ म्हणून खा किंवा भाजी म्हणून शरीरासाठी फायद्याचं ठरतंच.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात