पुण्यात धक्कादायक घटना, पतीने आत्महत्या केल्याचं पाहिल्यावर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात धक्कादायक घटना, पतीने आत्महत्या केल्याचं पाहिल्यावर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल

या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

  • Share this:

पुणे, 21 जून : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात आत्महत्येचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शहरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सूरज पालसिंग सोनी (वय 27, न्यू नानापेठ) व करीना पालसिंग सोनी (वय 20) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

पुण्यात आत्महत्येचं सत्र

19 जून रोजी पुण्यात सामूहिक आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली होती. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे.

मंडप व्यावसिकानेही संपवलं आयुष्य

सिंहगडरस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 19 जून रोजी पहाटे दोन ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

स्वप्निल उत्तम रायकर( 45 वर्षे ) रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी, ता. हवेली जि. पुणे असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिंहगडरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. त्यांनी राहत्या घरी किचन रूम मध्ये छताच्या हुकला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

First published: June 21, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या