मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

यूपीच्या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव, पटोलेंचा भाजपवर घणाघात

यूपीच्या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव, पटोलेंचा भाजपवर घणाघात

इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात.

इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात.

इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात.

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 14 नोव्हेंबर : 'जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश (uttar pradesh election), बिहारमध्ये (bihar) निवडणुका येतात. तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचं यांना सुचत असतं. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी भाजपवर केली.

नागपूर शहरात काँग्रेसच्या वतीने महागाई आणि बरोजगारीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

'जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये निवडणुका येतात. तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचं यांना सुचत असतं. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेली घटना पडसाद महाराष्ट्रात पडत आहे, हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात घेणार नाही, असंही पटोले म्हणाले.

T20 World Cup Final : सहा वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी न्यूझीलंड सज्ज

'आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेल आहे. देशामध्ये भुकबळी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे. देशाचा संविधान धोक्यात आलं आहे. या सगळ्या भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

'मी मित्र पक्षाबद्दल काही बोललो नाही, सुपारी हा शब्द वापरला नाही तर मित्रांपासून सुद्धा सावध राहा असं मी म्हटलो आहे. ही भाषा आमच्या लोकांना कळली तुम्हाला नाही कळणार. राष्ट्रवाद विदर्भात फार नाही हे विदर्भातील जनतेने वारंवार सांगितला आहे. मी दुकान असं म्हटलं नाही, असा खुलासाही पटोले यांनी केला.

बेपत्ता पत्नी दिसताच तरुणाने स्वत:च पेटून घेतलं; मुंबईतील हैराण करणारं प्रकरण

मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आम्ही आव्हान केले आहे, महाराष्ट्रात शांतता ठेवा. ज्या अफवा पसरवल्या जातात. त्याला बळी पडू नये, भाजपच्या गळाला कोणी लागू नये, असं आवाहन पटोले यांनी केलं.

'भाजपचे महाराष्ट्रातून पहाटेची सरकार गेली त्यामुळे ते रात्री स्वप्न न बघता दिवसा स्वप्न बघतात. त्यामुळे महाराष्ट्रात झालेली महाविकास आघाडी त्यांना पटू शकत नाही म्हणून ते सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करतात हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्यातील जनता त्याला भीक घालणार नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली.

First published: