Home /News /maharashtra /

मस्करी जिवावर बेतली, हेडफोन दिला नाही म्हणून तरुणाची हत्या, उल्हासनगरमधील घटना

मस्करी जिवावर बेतली, हेडफोन दिला नाही म्हणून तरुणाची हत्या, उल्हासनगरमधील घटना

ज्ञानेश्वरने आपल्याकडे असलेला चाकू आरोपी सुरेशवर उगारला. मात्र सुरेशने हाताला झटका देत तो चाकू जमिनीवर पाडला आणि त्याच चाकूने...

ज्ञानेश्वरने आपल्याकडे असलेला चाकू आरोपी सुरेशवर उगारला. मात्र सुरेशने हाताला झटका देत तो चाकू जमिनीवर पाडला आणि त्याच चाकूने...

ज्ञानेश्वरने आपल्याकडे असलेला चाकू आरोपी सुरेशवर उगारला. मात्र सुरेशने हाताला झटका देत तो चाकू जमिनीवर पाडला आणि त्याच चाकूने...

उल्हासनगर, 18 सप्टेंबर : उल्हासनगरमध्ये (ulhasnagar)  गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या आठवड्यभरापासून खून आणि हत्याचे (murder) सत्र सुरूच आहे. आजही हेडफोन दिला नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर सोनवणे या तरुणाची त्याचाच मित्र शिवड्या उर्फ सुरेश शिंदे यांनी चाकू भोसकून हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर, आरोपी सुरेश आणि त्यांचे मित्र एकत्र दारू पीत बसले होते. याच वेळी आरोपी सुरेश याने ज्ञानेश्वरच्या नकळत त्याचा हेडफोन (headphones) आणि मोबाईल (moblie) स्वतः जवळ ठेवला. तो परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी ज्ञानेश्वरने आपल्याकडे असलेला चाकू आरोपी सुरेशवर उगारला. मात्र सुरेशने हाताला झटका देत तो चाकू जमिनीवर पाडला आणि त्याच चाकूने ज्ञानेश्वरला भोसकून त्याची हत्या केली. ज्ञानेश्वरची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. VIDEO - 22 हजार खर्च करून कापले केस पण...; Haircut पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर पॅरोलवर सुटलेल्या आरोपी सुरेश शिंदे याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवली आणि आरोपी सुरेश शिंदेला अवघ्या 12 तासात अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी सुरेशवर या पूर्वी देखील गुन्हे दाखल असून तो कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आहे. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर आपल्या मित्रांसोबत दारू पार्टी करत असताना ही घटना घडली. दरम्यान, अवघ्या २४ तासात उल्हासनगर शहरात दुसरी हत्या झाल्याने पोलिसांना इथल्या गुंडांना जरप बसवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. भर रस्त्यावर तरुणाची टोळक्यांनी केली हत्या दरम्यान, उल्हासनगर कॅम्प 4 च्या नेताजी चौक बंगलो परिसरात एका तरुणाची पाच जणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर निर्घृणपणे (murder) हत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती.   उल्हासनगरमधील  कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुशांत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. पाच जणांच्या टोळीने सुशांतची हत्या केली. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी चाकू, तलवारी आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून ही हत्या कऱण्यात आली होती. Home Loan साठी अप्लाय करताना अजिबात विसरू नका हे 6 मुद्दे, सहजपणे मिळेल कर्ज हत्या करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, ही हत्या करणाऱ्या आणि विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असलेल्या गुंड आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याचे साथीदार अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, अवी थोरात आणि यश रुपवते यांना अटक केली. हिललाईन आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात ही कामगिरी केली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Murder

पुढील बातम्या