Home /News /viral /

तब्बल 22 हजार खर्च करून कापले केस पण...; Haircut पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी; VIDEO VIRAL

तब्बल 22 हजार खर्च करून कापले केस पण...; Haircut पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी; VIDEO VIRAL

केस कापल्यानंतर आरसा पाहताच तरुणीला बसला धक्का.

    ब्रिटन, 18 सप्टेंबर : आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसारखं दिसण्याची हौस अनेकांना असते. त्यासाठी किती तरी लोक अगदी हजारो रुपयेही खर्च करायला तयार असतात. पण विचार करा इतके पैसे खर्च (Woman spend 22000 for haircut) करूनही तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळाला नाही तर काय होईल? तुम्हाला अगदी उद्ध्वस्त झाल्यासारखंच वाटेल ना? असाच हेअरकट (Haircut video) करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Woman crying after haircut). या महिलेने हजारो रुपये खर्च करून आपले केस कापले. पण तिचे हे सर्व पैसे पाण्यात गेले. तिने हेअरकटनंतर जेव्हा आपला चेहरा आरशात पाहिला तेव्हा धक्काच बसला. तिला रडूच कोसळलं. तसे आपण सर्वजण केस कापतो. छानसा हेअरकट हवा म्हणून हजारो रुपये खर्चही करतो. पण या महिलेने हेअरकटसाठी फक्त काही हजार रुपये नव्हे तर तब्बल 22 हजार रुपये खर्च केले. साहजिक आपण आता छान दिसू अशी अपेक्षा तिला होती. हे वाचा - Hair Dye करताना एक छोटीशी चूक पडली महागात; सलूननंतर थेट गाठावं लागलं हॉस्पिटल पण इतके पैसे खर्च करूनही हवा तसा हेअरकट तर झालाच नाही उलट केसांची वाट लागली. जे पाहून महिला संतप्त झाली. ती ढसाढसा रडू लागली. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार या महिलेने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर आपला हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिचा विचित्र हेअरकट दिसून येतो. रडत रडत ती आपली व्यथाही मांडते. ही महिला म्हणते,  हेअरकटसाठी मी 300 डॉलर्स खर्च केले. पण मला हवा तसा हेअरकट मिळाला नाही.  ठिक आहे हा लूक मी स्वीकारण्याचा प्रयत्न करेन. मी मॅनेजरशी बोलणार आहे. या तरुणीचा तर फक्त हेअरकट खराब झाला आहे. पण सुंदर दिसण्याच्या नादात किती तरी जण स्वतःची वाट लावून घेतात. काही दिवसांपूर्वीच हेअरकलर करणारी एक तरुणीही चर्चेत आली होती. हे वाचा - भयंकर! सौंदर्याच्या नादात जीवाशी खेळ; नाजूक पायांसाठी नस कापून घेतायेत तरुणी केसांच्या कटप्रमाणे केसांना कलर करायलाही अनेकांना आवडतं. कॅनडाच्या (Canada) ओंटॅरिओत राहणारी (Ontario) 23 वर्षांची शेलिन गर्टली (Shaylene Gartly). आपण अधिक सुंदर दिसावं म्हणून तिने केसांना कलर करून घेण्याचा विचार केला. तिने सलूमध्ये हेअर करून घेतलं.  घरी पोहोचल्यानंतर काही तासांनी तिच्या डोक्यात खाज येऊ लागली. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तर तिचा चेहरा फुग्यासारखा फुगला होता. तिच्या चेहऱ्यावर सूज आली होती. डोक्यापासून मानेपर्यंत सूज होती. तिचा एक डोळा तर पूर्णपणे बंदच झाला होता. तिचा चेहराच विचित्र दिसू लागला. एखाद्या एलिअनसारखीच ती दिसू लागली. हे वाचा - पॅकिंग खोलत गेला खोलत गेला आणि हातात आलं...; Surprise Gift पाहून झाला Shocked आपली ही अवस्था पाहून तिने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात जाताच जे सुंदर केस तिने कलर करून घेतले ते तिचे केस कापावे लागले, जेणेकरून ती लवकरात लवकर बरी व्हावी.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle, Viral, Viral videos

    पुढील बातम्या