जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'सत्तेसाठी भाजपची लोकं दगडं मारायला कमी करणार नाही', बाळासाहेब थोरातांचा सणसणीत टोला

'सत्तेसाठी भाजपची लोकं दगडं मारायला कमी करणार नाही', बाळासाहेब थोरातांचा सणसणीत टोला

'दर आठवड्याला सरकार पडेल या आकांक्षाने भाजपमधील अनेक लोक मंत्रिपद मिळेल याकरता नवीन कपडे शिवतात पण त्यांना काही मुहूर्त लागत नाही'

'दर आठवड्याला सरकार पडेल या आकांक्षाने भाजपमधील अनेक लोक मंत्रिपद मिळेल याकरता नवीन कपडे शिवतात पण त्यांना काही मुहूर्त लागत नाही'

‘दर आठवड्याला सरकार पडेल या आकांक्षाने भाजपमधील अनेक लोक मंत्रिपद मिळेल याकरता नवीन कपडे शिवतात पण त्यांना काही मुहूर्त लागत नाही’

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 19 ऑक्टोबर : ‘दर आठवड्याला सरकार पडेल या आकांक्षाने भाजपमधील अनेक लोक मंत्रिपद मिळेल याकरता नवीन कपडे शिवतात पण त्यांना काही मुहूर्त लागत नाही. भाजप (bjp) सत्ते करता इतकी हपापलेली आहे की, आता ते लोकांना दगड मारले कमी करणार नाही’ असा सणसणीत टोला काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी भाजपला लगावला. ठाण्यात  पक्षीय बैठकीकरता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आले होते यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीचे सरकार कसे पाडता येईल. याकरता भाजप रोज नवनवीन युक्त्या लढवत आहे. तसंच आता केंद्रीय तपास यंत्रणांचा डाव आता भाजपवरच उलटणार आहे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. शिल्पा-राजविरोधातील आरोप शर्लिनला महागात; कोर्टात 50 कोटींचा मानहानीचा खटला ‘इतर पक्षातील लोक यावेळी भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांनी जाहीर वक्तव्य केले की, आम्हाला आता सुखाची झोप लागते कारण आम्हाला कोणत्याही कारवाईचे भय नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे यांनी कितीही मुहूर्त काढले तरी काहीही होणार नाही. भाजपचे लोक सत्तेकरता इतकी हपापलेली आहे की, आता ते लोकांना दगड मारले कमी करणार नाही’ असा टोला थोरात यांनी लगावला. ‘राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘स्थानिक पातळीवर जरी तिन्ही पक्षांतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये दिलजमाई होत नसली तरी निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्व एकत्र येऊ आणि एकत्रच निवडणूक लढवू’ असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं. शिवाय जर भाजपला सर्व सत्तेतून बाहेर ठेवायचे असेल तर भाजप विरोधक सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असा  पुनरुच्चार बाळासाहेब थोरात यांनी केला. दारुड्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी थेट आमदारांचा पुढाकार; म्हणे, दारू तर पिणारच! उत्तर प्रदेशात 40 टक्के महिलांना निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याची घोषणा काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी केली. हे कौतुकास्पद असून महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण दिली जाते आणि त्याचे परिणामही राज्याच्या विकासामध्ये दिसून आलेत. त्यामुळे राज्याच्या आगामी निवडणुकांमध्ये महिला लोकप्रतिनिधींची संख्या जास्त दिसेल, असं यावेळेस बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात