मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारुड्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी थेट आमदारांचा पुढाकार; म्हणे, दारू तर पिणारच! पाहा VIDEO

दारुड्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी थेट आमदारांचा पुढाकार; म्हणे, दारू तर पिणारच! पाहा VIDEO

ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडण्यात आलेल्या व्यक्तीला सोडवण्यासाठी थेट आमदार आणि त्यांच्या (MLA and her husband interferes in drunk and drive case) पतीनं पोलीस ठाणं गाठल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जोधपूर, 19 ऑक्टोबर : ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडण्यात आलेल्या व्यक्तीला सोडवण्यासाठी थेट आमदार आणि त्यांच्या (MLA and her husband interferes in drunk and drive case) पतीनं पोलीस ठाणं गाठल्याची घटना समोर आली आहे. ते केवळ पोलीस ठाण्यात गेले, एवढंच नव्हे तर तिथं जाऊन त्यांनी (Drama in police station) जोरदार तमाशा केला. तरुण मुलं आहेत तर या वयात दारू पिणारच, असा शहाजोगपणाचा (Strange suggestion to police) सल्लाही पोलिसांना दिला.

अशी घडली घटना

राजस्थानची राजधानी जोधपूरमध्ये एका तरुणाला मद्यपान करून गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं. त्याला घेऊन ते पोलीस ठाण्यात गेले. हा तरुण आमदारांचा नातेवाईक असल्याचं थोड्याच वेळात सिद्ध झालं. जोधपूरमधील काँग्रेसच्या आमदार मीना कंवर आणि त्यांचे पती उमेद सिंग थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. तिथं उपस्थित असणाऱ्या पोलिसांचं थेट बौद्धिक घ्यायलाच त्यांनी सुरुवात केली. तरुण मुलं ही दारू पिणारच. थोडीशी दारू प्यायली आणि गाडी चालवली तर काय बिघडतं, असा सवालच त्यांनी पोलिसांना केला. " isDesktop="true" id="620373" >

व्हिडिओ शूटिंगला आक्षेप

आमदार आणि त्यांच्या पतीचा हा हंगामा एक पोलीस शिपाई त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित करत होता. आमदार बाईंचं त्याकडे लक्ष गेल्यावर त्यांनी त्याला आक्षेप घेतला. आमदारांच्या पतीराजांनी पोलीस शिपायाची कानउघडणी करत शूटिंग बंद करायला लावले. मात्र तोपर्यंत दोघांचाही कारनामा मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला होता. पोलीस स्टेशनमधून आमदारांचा पती सतत कुणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अखेरपर्यंत फोन काही लागला नाही.

अखेर आरोपीची सुटका

आमदार आणि त्यांच्या पती महाशयांचा अवतार पाहून अखेर पोलिसांनी आरोपीची सुटका करण्याचा निर्णय़ घेतला. मांडी ठोकून पोलीस ठाण्यात बसलेल्या आमदारांनी आरोपीला घेतल्याशिवाय तिथून उठणारच नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी आरोपीला सोडून दिले.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल असून नेटकरी आमदारांवर आणि त्यांच्या पतीवर जोरदार टीका करत आहेत.

First published:

Tags: Crime, Mla, Rajasthan