मुंबई 19 ऑक्टोबर : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राने**(Raj Kundra Pornography Case)** अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) विरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. आयएएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या विरोधात मानसिक आणि लैंगिक छळासह फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतरच शिल्पा आणि राज यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर तो सोशल मीडिवर चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकरणी पोलिसांनी शर्लिन चोप्राचे जबाब नोंदवला होता. यानंतर शर्लिनने राजवर ऑनलाईन पॉर्न बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप केला होता. त्यांनतर शर्लिन चोप्राने(Sherlyn Chopra) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलिसात तक्रार(FIR) केली होती. शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी विरोधात मानसिक आणि लैंगिक छळासह फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. वाचा : Manike Mage Hithe फेम Yohaniची बॉलिवूडमध्ये एंट्री; ‘या’ सिनेमातून करणार पदार्पण शर्लिन चोप्रा तिच्या लिगल टीमसह जुहू पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती, तिथे तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल केली होती. शर्लिनने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यात तिने खुलासा करत म्हटलं आहे की, ‘राज कुंद्राने तिचं फक्त शोषणच केलं नाही तर अंडरवर्ल्डची धमकीसुद्धा दिली आहे’. वाचा : अमिताभ बच्चन- क्रिती सेनन यांचा Ballroom कपल डान्स पाहून तुम्हीही म्हणाल वाहवा! यासोबतच शर्लिन चोप्राने असं देखील म्हटलं आहे की, ‘ती 20 एप्रिल 2021 रोजी जुहू पोलीस स्टेशनमध्ये राज कुंद्राविरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी हजरसुद्धा झाली होती. तसेच राज कुंद्रावर आणखी आरोप करत शर्लिन म्हणाली होती की, 27 मार्च 2019 रोजी कुंद्रा रात्री उशिरा तिच्या घरी आला होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केले होते’. ती पुढं म्हणाली होती की, २मार्च रोजी तिने कुंद्राच्या दबावाखाली फोटोशूट केलं होतं . त्यानंतर शर्लिनने आरोप केला की पुढील 10 महिने राज कुंद्रा तिच्या इतर फर्म जेएल स्ट्रीममध्ये सामील होण्यासाठी मागे लागला होता. आणि तिला फिटनेससंबंधित सामग्री अपलोड करण्यासदेखील सांगितलं होतं’, असे आरोप शर्लिनने राज कुंद्रावर केले होते.
आज मैं अपनी कानूनी टीम के साथ जुहू पुलिस स्टेशन पर गई थी राज कुंद्रा और शिल्पा शेट्टी के खिलाफ़ शिकायत दर्ज कराने।@TheShilpaShetty pic.twitter.com/46TkiXTs6t
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) October 14, 2021
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यानंतर शिल्पा आणि राज यांच्या नात्यामध्ये फूट पडली असल्याचे देखील म्हटले जात होते. पण आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे एकत्र आले असून त्यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.