जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / द्रोह करणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा... प्रकाश आंबेडकरांचा इशारा

द्रोह करणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा... प्रकाश आंबेडकरांचा इशारा

द्रोह करणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा... प्रकाश आंबेडकरांचा इशारा

आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते….

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 सप्टेंबर: महाविकास सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, असा धक्कादायक गौप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यावर भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जहरी टीका केली असताना आता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा. त्या पोलिसांना अटक करा, अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. हेही वाचा.. राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर… भाजप नेते अतुल भातखळकर यांची जहरी टीका काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे. ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला, असल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काय आहे प्रकरण? ‘दैनिक लोकमत’ ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे. काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही, असं सांगत गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले. एवढंच नाहीतर, शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकाऱ्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहे. अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केली होती. दरम्यान, मार्च महिन्यात लॉकडाउन लागू झाला. त्यानंतर अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाऱ्यांनी येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह 22 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी पत्र दिले होते. या पत्रामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले होते. नुकतीच अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली असून पुण्याचे आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. अमिताभ गुप्ता यांच्याकडून मोठी चूक झाली होती. त्यांनी खुद्द चौकशी समितीकडे याची कबुली दिली. पण त्यांची कारकिर्द चांगली असल्यामुळे त्यांना पुण्याचा पदभार दिला, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. हेही वाचा… गाडी अडवून दाखवले काळे झेंडे, ABVPच्या कार्यकर्त्यांना सामंतांनी दिलं ‘हे’ उत्तर भाजपचे नेते वारंवार राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत असतात. कोणत्याही मुद्यावर देवेंद्र फडणवीस हे राजभवनाकडे धाव घेतात. त्यापेक्षा फडणवीस यांनी राजभवनावर खोली घेऊन राहावे, म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास कमी होईल, असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात