मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'गब्बर' सिनेमातला सीन सांगलीत, पैशासाठी डॉक्टराने मृतदेहावर 2 दिवस केले उपचार

'गब्बर' सिनेमातला सीन सांगलीत, पैशासाठी डॉक्टराने मृतदेहावर 2 दिवस केले उपचार

दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत ...

दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत ...

दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत ...

  • Published by:  sachin Salve

सांगली, 08 जुलै: अभिनेता अक्षयकुमारच्या गब्बर (Akshay Kumar Gabbar is Back movie) या सिनेमात एका मृत व्यक्तीवर हॉस्पिटलमध्ये खोटे खोटे उपचार करण्यात आल्याचे दृश्य दाखवण्यात आले होते. पण, असाच प्रकार सांगलीमध्ये घडला आहे.  मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर तब्बल 2 दिवस उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या (Sangali) इस्लामपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर (Yogesh Watharkar) याला अटक करण्यात आली आहे.  या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर (Aadhaar Health Care Sangali) आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 24 फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई  सायरा (वय 60) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअरमध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने उपचार केले. रुग्ण सायरा यांच्यावर नॉन कोविड उपचारादरम्यान 8 मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या ‘त्या’ निर्णयाचा बेन स्टोक्सला धक्का, म्हणाला...

दोन दिवसांनी डॉ.वाठारकर यांनी नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचराबाबत 2 दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना दहा मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून 41 हजार 289 इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.

दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम ४०६, ४२०, ४६४, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान मोदींकडून 'या' मंत्र्यांना नारळ

सायरा शेख यांचा आधार हेल्थ केअरमध्ये उपचारादरम्यान 8 मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे.  मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू 8 मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र डॉक्टरांनी मृतदेह 10 मार्चला ताब्यात दिला. यामुळे नेमके काय ? ही परिस्थिती नातेवाईकांनी जाणून घेत डॉक्टर विरोधात तक्रार केली आणि या प्रकरणी पाठपुरावा केला. सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करत मृतदेहाची विटंबना केल्याचे अखेर बिंग फुटले. ECf डॉ.  वाठारकर अलगद फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला.

First published:

Tags: Dead body, Maharashtra, Mumbai, Private hospitals, Sangali, Shocking news