लंडन, 8 जुलै: इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सची (Ben Stokes) पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी (ENG vs PAK ODI) कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) या निर्णयावर स्टोक्सनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंग्लंड टीमशी संबंधित सात जणांना कोरोनाची लागण झाल्यानं बोर्डानं हा निर्णय घेतला. पाकिस्तान विरुद्धची वन-डे मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे. या मालिकेत स्टोक्स 9 नवोदीत खेळाडूंच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहे. स्टोक्सनं ‘डेली मिरर’मध्ये लिहिलेल्या कॉलमध्ये हा अनुभव सांगितला आहे. ‘मला फक्त तीन दिवसांचा अवधी मिळाला. त्यामुळे कपड्यांची अतिरिक्त धुलाई करावी लागली. मी व्हाईट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तयार नव्हतो. माझी दुखापत सध्या बरी होत आहे. भारत विरुद्धच्या टेस्ट सीरिजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची माझी योजना होती. पण, अचानक सर्व परिस्थिती बदलली. पाकिस्तानला आव्हान देणार तीन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर इंग्लंडनं वन-डे टीममध्ये मोठा बदल केला. कॅप्टन इयन मॉर्गन, जो रुट, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड हे सर्व जण या मालिकेत खेळणार नाहीत. या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्येही स्टोक्सला टीमवर पूर्ण विश्वास आहे. इंग्लंडची नवी टीम चांगली असून जगातील कोणत्याही टीमला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे, असे त्याने स्पष्ट केले. ‘पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी सध्या आमच्याकडे 20 खेळाडूंचा पर्याय नाही. तरीही आमची टीम सर्वोत्तम आहे. या टीममधील खेळाडूंकडे पुरेसा अनुभव आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये इतक्या कमी कालावधीत नवी टीमची निवड अन्य कोणत्या देशाला शक्य आहे, हे मला माहिती नाही. सर्व तरुण खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे ’, असे स्टोक्स यावेळी म्हणाला. अनुराग ठाकूर झाले नवे क्रीडामंत्री, पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर हरभजनचं मोठं वक्तव्य इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वन-डे मालिका 8, 10 आणि 13 जुलै रोजी होणार असून टी 20 मालिका 16, 18 आणि 20 जुलै रोजी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.