• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोदींनी जवळपास 13 मंत्र्यांना दिला डच्चू, वाचा संपूर्ण नारळ मिळालेल्या मंत्र्यांची यादी

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोदींनी जवळपास 13 मंत्र्यांना दिला डच्चू, वाचा संपूर्ण नारळ मिळालेल्या मंत्र्यांची यादी

Cabinet Minister Exit list: या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र यावेळी मोदींनी 12 मंत्र्यांना (Minister) नारळ दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्य काळाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) बुधवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र यावेळी मोदींनी 12 मंत्र्यांना (Minister) नारळ दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या मंत्र्यांना नारळ बाबूल सुप्रियो देबश्री चौधरी संजय धोत्रे डॉ. हर्षवर्धन संतोष कुमार गंगवार रमेश पोखरीयाल निशंक डी. व्ही. सदानंद गौडा प्रकाश जावडेकर महेंद्रनाथ पांडे थावरचंद गेहलोत प्रताप चंद्र सारंगी रतन लाल कटारिया रवीशंकर प्रसाद केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातल्या 8 मंत्र्यांची नावं नितीन गडकरी पियुष गोयल रावसाहेब दानवे रामदास आठवले नारायण राणे कपिल पाटील भागवत कराड डॉ.भारती पवार केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेही वाचा- नारायण राणेंचं मंत्रीपदी प्रमोशन झाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. अनेक जुने चेहरे मंत्रिमंडळातून बाहेर पडले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलला आहे. या मंत्रिमंडळाचं स्वरूप सर्वसमावेशक ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. मंत्रिमंडळात सध्या 12 अनुसुचित जातींचे, 8 अनुसुचित जमातींचे, 27 ओबीसींचे तर 5 अल्पसंख्याक मंत्री आहेत. नव्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या 9 राज्यांतील एकूण 11 महिला आहेत. त्यातील दोघींना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनुसुचित जातींच्या 12 मंत्र्यांपैकी दोघांना, तरअनुसुचित जमातीच्या 8 पैकी 3 जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. हेही वाचा- मंत्रिमंडळात राज्याच्या शिलेदारांचा आकडा वाढला, नव्या चार शिलेदारांची वर्णी ओबीसी समाजातील 27 मंत्री असून त्यातील 5 मंत्र्यांना कॅबिनेट दर्जा आहे. नव्या मंत्रिमंडळाचं वय कमी झालं आहे. यापूर्वी मंत्रिमंडळाचं सरासरी वय 61 वर्षं होतं. तर नव्या चेहऱ्यांचं सरासरी वय 58 वर्षं आहे. देशातील सर्व राज्यांना या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. राजकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. फेरबदलानंतर आता 7 मंत्री डॉक्टरेट मिळवलेले, 3 एमबीए तर 68 मंत्री पदवीधर आहेत. शिवाय एकूण 13 वकील, 6 डॉक्टर आणि 5 मंत्री इंजिनिअर आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: