• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • दुसऱ्या मुलासोबत बोलली म्हणून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विहिरीत ढकलले, वर्ध्यातील घटना

दुसऱ्या मुलासोबत बोलली म्हणून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विहिरीत ढकलले, वर्ध्यातील घटना

त्याची प्रेयसी एका मुलासोबत बोलत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

 • Share this:
  वर्धा, 29 जून : दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले म्हणून प्रियकराने (boyfriend) एका अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये घडली आहे. खून केल्यानंतर पाच दिवसांनंतर घटना उघडकीस आली. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आत्राम असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आर्वी शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. आरोपी अजयने अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी त्याची प्रेयसी एका मुलासोबत बोलत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात अजयने मुलीला जवळच असलेल्या एका विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर घटनास्थळावरून तो पसार झाला. 'या' 2 अटी पूर्ण करणाऱ्या मुलाशी लग्न करेल', स्मृती मंधानानं केलं जाहीर चार ते पाच दिवसानंतर मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिकांनी विहिरीत पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. अल्पवयीन मुलीची ओळख पडल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. त्यानंतर मारेकरी प्रियकर अजय आत्रामला अटक करण्यात आली. या प्रकरणी अजयविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे. वाशिममध्ये भावाच्या मृत्यूच्या धक्क्यानं धाकट्यानंही सोडला प्राण दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील सोयजना येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीचा रविवारी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. आपल्या भावाच्या निधनाची बातमी समजताच धाकट्या भावालाही हृदयविकाराचा (Heart attack) धक्का बसला. ज्यामध्ये त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतरानं दोघा भावंडाच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त केली जात होती. सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना या दोन भावांमधील अतूट प्रेम पाहून गहिवरलेल्या गावातील अन्य एका व्यक्तीचाही हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झालं. एकाच दिवशी गावात तीन लोकांच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली होती. जनार्दन सीताराम पवार (वय-75) असं उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मोठ्या भावाचं नाव आहे. ते मनोरा तालुक्यातील सोयजना येथील रहिवासी आहेत. मागील काही काळापासून ते विविध आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: