कर्नाटक, 28 जून: गेल्यावर्षी पासून देशात कोरोना (Corona Virus) व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशातील कोरोना व्हायरसची दुसरी लाटही आटोक्यात येत आहे. मात्र दुसरी भारतात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं (delta plus variant)डोकं वार काढलं आहे. या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका दर्शवण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यातच आता कोरोना संदर्भात अजून एक चिंता वाढली आहे. कर्नाटकमध्ये 13 वर्षाच्या मुलामध्ये दुर्मिळ कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
कर्नाटकातील 13 वर्षाच्या मुलामध्ये मेंदूवर परिणाम करणारा असा दुर्मिळ कोरोना व्हायरस आढळून आला आहे. (Rare covid-19 complication) कर्नाटक राज्यात घडणारी ही पहिली घटना आहे. रविवारी एस एस इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज एंड रिसर्च सेंटर (SS Institute of Medical Sciences and Research Center)नं या संदर्भातली माहिती दिली आहे.
हेही वाचा- मुंबईकरांनो; आजपासून असे असतील नियम, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा
या बालपणातील एक्यूट नेक्रोटाइजिंग एन्सेफलोपॅथी (ANEC) असं म्हटलं जातं. हुविनाहदगली गावातल्या एका 13 वर्षाच्या मुलामध्ये हा दुर्मिळ कोरोना आढळून आला आहे. संस्थेचे संचालक डॉ. एन के कलप्पनवार यांनी PTIशी बोलताना सांगितलं की, बाधित मुलगा नुकताच कोरोनामुक्त झाला होता आणि त्यानंतर तो ANEC बाधित झाला. आतापर्यंत अशी परिस्थिती होती की कोविड- 19 नंतर मुलांना फक्त मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमचा सामना करावा लागत होता. मात्र आता आपल्याला ANEC कडेही लक्ष द्यावं लागेल.
डॉ. एन के कलप्पनवार यांनी पुढे सांगितलं की, माझ्या मते राज्यात अशा दुर्मिळ कोरोनाचं पहिले प्रकरण समोर आलं आहे. मुलाच्या शरीरात अॅन्टीजेन्सचे उच्च प्रमाण आढळलं. ज्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. मुलाची प्रकृती आता ठिक होत आहे. या रोगाचा वेळेवर उपचार केला नाही तर ते प्राणघातक ठरू शकते. या आजारावर उपचार देखील खूप महाग आहेत. या आजाराच्या उपचारावरील एका इंजेक्शनची किंमत 75 हजार ते एक लाखांपर्यंत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.