मुंबई, 28 जून : इंग्लंड दौऱ्यावर असलेली भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही क्रिकेट फॅन्समध्ये खूप लोकप्रिय आहे. भारताची ओपनिंग बॅटर असलेली स्मृती अनेकांचा तरुणांचा क्रश आहे. स्मृतीचे फोटो हो सतत सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत असतात. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या एकमेव टेस्टच्या दरम्यान देखील तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. ‘नॅशनल क्रश’चा दर्जा मिळालेल्या स्मृतीला फॅन्स अनेकदा वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत असतात. एका फॅन्सनं तिला लाईफ पार्टनरबद्दल प्रश्न विचारला. तुझा लाईफ पार्टनर होण्यासाठी काय निकष काय आहे? असा प्रश्न स्मृतीला विचारला होता. क्रिकेटच्या फॅन्सवर टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्मृतीनं त्या प्रश्नावरही अगदी सरळ आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिले. स्मृतीनं या उत्तरात सांगितले की ‘माझा लाईफ पार्टनर होण्याच्या दोन अटी आहेत. पहिली अट म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम हवं आणि दुसरी म्हणजे त्यानं पहिली अट फॉलो केली पाहिजे.
स्मृती मंधनानं वयाच्या 17 व्या वर्षीच इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये पदार्पण केले होते. तिला 2019 साली ‘आयसीसी महिला क्रिकेट ऑफ द इयर’ या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आले आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकमेव टेस्टमध्ये स्मृतीनं पहिल्या इनिंगमध्ये 78 रनची खेळी केली होती. भारताने ती टेस्ट ड्रॉ केली. IND vs ENG: शफाली वर्माबद्दल मॅचमध्ये मोठी चूक, भारतीय फॅन्स नाराज ब्रिस्टलमध्ये शनिवारी झालेल्या वन-डेमध्ये स्मृतीला फार कमाल करता आली नाही. ती फक्त 10 रन काढून आऊट झाली. आता भारताला वन-डे मालिका जिंकण्यासाठी उरलेले दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. या मॅचमध्ये अनुभवी स्मृतीकडून टीम इंडियाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.