जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सुसाट दुचाकी आऊट ऑफ कंट्रोल झाली, पुलावरून दोघेही तरुण खाली कोसळले, जागीच मृत्यू

सुसाट दुचाकी आऊट ऑफ कंट्रोल झाली, पुलावरून दोघेही तरुण खाली कोसळले, जागीच मृत्यू

ठाण्यातील कॅसलमिल नाका इथं ही घटना घडली. माजीवाडाकडून ठाणे स्टेशनकडे जाताना उड्डाणपुलावर हा अपघात झाला

ठाण्यातील कॅसलमिल नाका इथं ही घटना घडली. माजीवाडाकडून ठाणे स्टेशनकडे जाताना उड्डाणपुलावर हा अपघात झाला

ठाण्यातील कॅसलमिल नाका इथं ही घटना घडली. माजीवाडाकडून ठाणे स्टेशनकडे जाताना उड्डाणपुलावर हा अपघात झाला

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 24 जानेवारी : ठाण्यामध्ये अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून खाली कोसळ्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झालाा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कॅसलमिल नाका इथं ही घटना घडली. माजीवाडाकडून ठाणे स्टेशनकडे जाताना उड्डाणपुलावर हा अपघात झाला. पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रतिक मोरे (वय २१ वर्षे) आणि राजेश गुप्ता (वय २६ वर्षे) अशी मृत तरुणांची नाव आहे. (उधारीचे 20 रुपये मागितले म्हणून चाकूनेच भोसकले, नागपूर हादरलं!) आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार पहाटे ०३:३० वाजता सुमारास कॅसलमिल नाका, ठाणे (प.) या ठिकाणी माजिवडाकडून ठाणे स्टेशनकडे जात असताना कॅसलमिल उड्डाण पुलावरती टी.व्ही.एसची दुचाकी क्रमांक MH 04 LK 4220 या दुचाकी चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने उड्डाण पुलावरील संरक्षण कटड्याला धडकून अपघात झाला होता. (थेट स्वयंपाक घरातच डल्ला, चोरट्यांनी दागिन्यांची पोटली केली लंपास) दुचाकी चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने उड्डाण पुलावरील संरक्षण कठड्याला धडकून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही तरुण उड्डाण पुलावरून खाली पडले. दुचाकीचा जास्त वेग असल्यामुळे दोन्ही तरूण कठड्याला धडक लागल्यानंतर खाली फेकले गेले. या अपघातातील दोन्ही व्यक्तींना राबोडी पोलीस कर्मचारी यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून त्या दोन्ही व्यक्तीना मयत घोषित केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात