• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'बाळासाहेबांच्या खोलीत तुम्ही दिलेला शब्द मोडला म्हणून..., संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'बाळासाहेबांच्या खोलीत तुम्ही दिलेला शब्द मोडला म्हणून..., संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला, तो फिरवला, फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणा विरोधात लढलो'

'बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला, तो फिरवला, फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणा विरोधात लढलो'

'बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला, तो फिरवला, फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणा विरोधात लढलो'

  • Share this:
    नाशिक, 23 ऑक्टोबर : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर Nashik Municipal Election) आता राजकीय आखाडा तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना (shivsena) आणि भाजपची (bjp) युती होती पण बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत भाजपनेच शब्द मोडला म्हणून युद्धाला सुरुवात झाली, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर केली. शिवसेना नेते संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे.   सकाळी शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे संपन्न झाले. त्यानंतर राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी संवाद मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांची चौफेर तोफ धडाडली. 'भाजपने तेव्हा शब्द फिरवला आणि लढाईला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला, तो फिरवला, फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणा विरोधात लढलो. बाळासाहेब यांच्या आशीर्वादाने शब्द खरा झाला. रामायण-महाभारत कशामुळे झाले, खोटेपणामुळे झाले. रोज आमच्यावर हल्ले होत आहेत, जणू रोज भ्रष्टाचारचे पीक येतं की काय? असा सवालही राऊत यांनी विचारला, raj thackeray corona positive : राज ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज 'याच नाशिकच्या भूमीतून सावरकर आलेत. त्या सावरकरांची बदनामी करण्याचे काम भाजपने सुरू केली. सावरकर यांनी माफी मागितली हे भाजपने सुरू केले. आम्ही कोणत्याही आघाडीत असो हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनेचे काम करणे ही एक नशा आहे. माझ्यासारखे लाखो शिवसैनिक काम करतात म्हणून शिवसेना आज आहे, असंही राऊत म्हणाले. Apple : LCD डिस्प्लेसह iPhone SE3 होणार लाँन्च; पाहा काय आहेत फीचर्स ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासठी ४० सभा घेतल्या,दंगली घडवल्या,पैशाच पाऊस पाडला मात्र तेथील जनतेन ममताना साथ दिली. बाहेरच्या शक्ती महाराष्ट्रावर चाल करून येताय त्यांना देखील आपली ताकत दाखवून द्यावं लागेल, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम नाही हे दाखवाव लागेल. विधानसभेत १०० आमदार आपले असावे असं काम करायचं आहे. उद्धव ठाकरे यांना केंद्रात बघायचं असेल तर जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून द्यावे,असंही राऊत म्हणाले. भाजपच्या नगरसेवकांनी केला राऊतांचा सत्कार यावेळी भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या 3 ते 4 विद्यमान नगरसेवकांनी हजेरी लावली होती. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. पण, भाजपचे नगरसेवक विशान संगमनेरे यांनी  शिवसेनेच्या व्यासपीठावर राऊत यांचा सत्कार केला. यावेळी बोलत असताना राऊत म्हणाले की, ED-CBI ला घेऊन आमच्याशी लढायचं असेल तर ही गर्दी बघून घ्या. भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे ही सुरुवात आहे. काल पासून १७ ते १८ लोक भेटून गेले आहे. सरकार पडणार पडणार म्हणणाऱ्यांनी हे बघावं. NCB पकडलेला गांजा घेऊन सरकार पडण्याच्या बाता मारता. हिंमत असेल तर त्यांना हलवून दाखवावा २८ तारखेला २ वर्ष होतील, असा इशाराच राऊत यांनी भाजपला दिला.
    Published by:sachin Salve
    First published: