नशेखोरीला ऊत... 'तो' विकत होता चक्क गर्भपाताच्या गोळ्या, असा झाला भंडाफोड

नशेखोरीला ऊत... 'तो' विकत होता चक्क गर्भपाताच्या गोळ्या, असा झाला भंडाफोड

मालेगाव शहरात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू असताना नशेखोरीला अक्षरश: ऊत आला आहे.

  • Share this:

 

मालेगाव, 17 जून: मालेगाव शहरात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू असताना नशेखोरीला अक्षरश: ऊत आला आहे. नशेच्या गोळ्या व औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्या एका भामट्याला विशेष पोलिस पथकाने अटक केली. त्याच्याकडून गर्भपात गोळ्या, कुत्तागोली व कोरेक्स औषधांचा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा... झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी उच्चशिक्षित तरुणांनी धरला 'हा' मार्ग, पण...

मिळालेली माहिती अशी की, शहरात नशेखोरीमुळे अनेक सराईत गुन्हेगार व तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याने अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी लक्ष केंद्रीत केले होते. आझादनगर भागातील वसीम अब्दुल खालिद शेख हा गोळ्यांची विक्री करताना ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता गर्भपाताच्या गोळ्यांचे 53 बॉक्स, अॅलप्राझोलम गोळ्यांची 21 पाकिटे व खोकल्याच्या कोरेक्स औषधाच्या 146 बाटल्या जप्त केल्या.

यापूर्वी वसीमविरोधात याबाबत दोन गुन्हे दाखल आहेत. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, कर्मचारी दिनेश शेरावते, अभिजित साबळे, तुषार आहिरे या विशेष पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

हेही वाचा... VIDEO: रेल्वे रुळावर अडकलेल्या कारला मालगाडीची जोरदार धडक, कारमध्ये होती युवती

गुजरात कनेक्शन...

गर्भपात गोळ्या, कुत्तागोली व कोरेक्स औषधांचा नशा म्हणून वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात तरुणांचा मोठा समावेश आहे. वसीम सुरतहून (गुजरात) ही औषधे आणत होता. वसीम इच्छितस्थळी संबंधितास बोलावून वाढीव दरात गोळ्या व औषधे देत होता. याबाबतच तीन महिन्यांपूर्वी नाशिकच्या एका औषधविक्रेत्यास अटक झाली होती. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

First published: June 17, 2020, 2:00 PM IST

ताज्या बातम्या