Home /News /maharashtra /

झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी पोलिस अधिकाऱ्यांसह उच्चशिक्षित तरुणांनी धरला 'हा' मार्ग, पण...

झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी पोलिस अधिकाऱ्यांसह उच्चशिक्षित तरुणांनी धरला 'हा' मार्ग, पण...

मांडूळ आणि कासवाची पूजा करून त्यांचा बळी दिल्यास धनप्राप्ती होऊन पैशांचा पाऊस पडतो....

मनमाड, 17 जून: झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी सुशिक्षित तरुणाई काही करायला तयार होत असल्याचा एक धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला येथे समोर आला आहे. धनप्राप्ती व पैशांचा पाऊस पडेल या लालसेपोटी मांडूळ, कासवची तस्करी करणारी 19 जणांची टोळीचा पर्दाफाश झाला आहे. वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पोलिस अधिकाऱ्यांसह उच्चशिक्षित, उच्चभ्रू तरुणांचा समावेश आहे. सगळे आता तुरुंगाची हवा खात आहेत. हेही वाचा...VIDEO: रेल्वे रुळावर अडकलेल्या कारला मालगाडीची जोरदार धडक, कारमध्ये होती युवती काय आहे प्रकरण? झटपट श्रीमंत होण्यासाठी उच्चशिक्षित, उच्चभ्रू तरुणांचा देखील अंधश्रद्धा मार्गाचा अवलंब करतात. मात्र, हा मार्ग त्यांना आता थेट तुरुंगात घेऊन गेला आहे. मांडूळ आणि कासवाची पूजा करून त्यांचा बळी दिल्यास धनप्राप्ती होऊन पैशांचा पाऊस पडतो, या लालसेपोटी मांडूळ व कासवची तस्करी करणाऱ्या टोळीचा येवला वनविभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आले असून त्यात एका पोलिस अधिकाऱ्यांसह उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू तरुणांचा समावेश आहे. येवल्याच्या सत्यगाव येथे मांडूळची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती नाशिक पूर्व वनविभागाच्या येवला रेंज आणि फिरते दक्षता पथकाला मिळाली होती. वनविभागानं पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून एका आरोपीला रंगेहात पकडले. त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. धागेदोरे ठाणे, अहमदनगर, पुणे व सिन्नरपर्यंत गेले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून तब्बल 19 आरोपींना अटक केली. त्यात एका पोलिस अधिकाऱ्यांसह उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू तरुणांचा समावेश आहे. हेही वाचा...शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, पतीनं रागात पत्नीलाच पंख्याला लटकवलं आरोपींकडून मांडूळ, कासव, ऑडी कार यासह इतर सहित्य जप्त करण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती येवल्याचे वन विभाग अधिकारी संजय भंडारी यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या