जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

Thane Railway station CCTV: लोकल पकडण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय ठाण्यात रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पाहायला मिळाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 13 मे : धावत्या रेल्वेतून उतरु नका, धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करु नका तसेच रेल्वे ट्रॅक ओलांडण्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करा अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र, असे असले तरी अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लोकल पकडण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय ठाणे रेल्वे स्थानकाच्या (Thane Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पाहायला मिळाला. जर पोलीस कर्मचाऱ्याने वेळेवर हात दिला नसता तर युवकाचा जीव क्षणार्धात गेला असता. या सर्व प्रकाराच सीसीटीव्ही फुटेज (CCTV video) अंगावर काटा आणणारे आहे. गुरुवारी (12 मे) सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून रूळ ओलांडून जाण्याचा एका प्रवाशाने प्रयत्न केला. मात्र, या नादात येणाऱ्या रेल्वेचा स्पीड न समजल्याने आणि रेल्वे येताना दिसल्यावर स्तब्ध झालेल्या युवकाला पोलीस शिपाई तुषार सोनताटे याने हात दिला आणि त्याला फलाटावर ओढले. त्यामुळे त्याचा जीव बचावला आहे.

जाहिरात

हा प्रकार घडत असताना त्या लोकल चा धक्का आपल्यालाही लागू शकतो याचा विचारही तुषार यांनी केला नाही आणि त्या युवकाचे प्राण वाचले. या प्रकाराचे सीसीटीव्ही दृश्य पाहिल्यानंतर तुषार यांच्या वरिष्ठांनी त्याचे कौतुक तर केले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील तुषार यांचे कौतुक केले आहे. मुंबईचा रिअल सिंघम , स्वतःवर चाकूचा वार झेलत वाचवला तरुणीचा जीव मुंबईत भरदिवसा भररस्त्यात तरुणीवर झालेल्या चाकू हल्लाचा थरार काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली. सुदैवानं मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला आहे. ही घटना मुंबईतल्या वडाळा येथील बरकत अली नाका येथे घडली. ही घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाचा :  जळगावचा पारा 45.5 अंशांवर… विदर्भातही 45 ला टेकला, उष्णतेच्या लाटेचा alert तरुणीच्या घरचे लग्न करण्यास परवानगी देत नाहीत म्हणून संतापलेल्या तरुणाने गंभीर पाऊल उचललं. त्यानं रागाच्या भरात तरुणीला भररस्त्यात गाठून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. आरोपी तरुण धारदार चाकूनं तरुणीवर सपासप वार करणार तेवढ्यात पोलीस कर्मचारी मयूर पाटील यांनी त्या माथेफिरू तरुणाला वेळीच अटकाव करून तरुणीचे प्राण वाचवले. मात्र यावेळी आरोपी तरुणानं केलेला एक वार पाटील यांच्या हातावर झाल्यानं ते देखील या हल्ल्यात जखमी झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात