मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ठाणे पालिकेच्या 'या' विभागाला लागू शकते आग, भाजप नगरसेवकाचा आरोप

ठाणे पालिकेच्या 'या' विभागाला लागू शकते आग, भाजप नगरसेवकाचा आरोप

अनेक नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले

अनेक नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले

अनेक नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले

ठाणे, 27 फेब्रुवारी : काही वर्षांपूर्वी मंत्रालयात लागलेली आग आणि नुकतीच जीएसटी भवनाला लागलेली आग या दोन्ही आगीत मोठे नुकसान झाले आणि महत्त्वाचे दस्तावेज जळून राख झाले. तीच परिस्थिती ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागाची होवू शकते, आग लागू शकते किंवा लावली जावू शकते आणि पर्यायाने ठाणे महानगरपालिकेचे देखील यांत मोठे नुकसान होवू शकते, असा आरोप आणि भिती व्यक्त करत या विषयाचे पत्र ठाणे मनपाचे भाजपे नगरसेवक नारायण पवार यांनी ठाणे मनपा आयुक्तांना दिल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे महानगरपालिका नेहमीच वादात असते. त्यात ठाण्यात राजकीय नेते, अधिकारी आणि बिल्डर अशा अभ्रद युतीमुळे अनेक नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानुसार बिल्डरांना सीसी, पार्ट ओसी, ओसी आणि टीडीआर देण्यात आल्याची अनेक कागदपत्रे आहेत. त्यातील काही वादग्रस्त प्रस्तावांबाबत अनेक तक्रारीही सरकारदरबारी दाखल आहेत. तर काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही दाखल आहेत.

या सर्व महत्वाच्या फाईल्स शहर विकास विभागात आहेत. तर धक्कादायक म्हणजे डिजीटल ठाणे असा टिमका मिरवणाऱ्या ठाणे मनपाचे सर्वात प्रमुख खाते शहर विकास विभागाच डिजीटल झाले नसून शहर विकास विभागात फाईली धूळ खात पडल्या आहेत. त्यात नुकतेच आयुक्त संजीव जैस्वाल यांनी “ठाणे मनपातील अधिकारी म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारे अधिकारी आहेत, मला जर ठाणे मनपा आयुक्तपदाचा पदभार आणखी काही दिवस वाढवून दिला तर मी या अधिकाऱ्यांना सोडणार नाही” असा संदेश ठाणे मनपा अधिका-यांच्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर पोस्ट केला होता.

यामुळे काही अधिकारी शहर विकास विभागातील फाईली नष्ट करण्याच्या तयारीत आहे, असा खळबळजनक आरोप देखील नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. या आगीपासून संरक्षण होण्यासाठी शहर विकास विभागातील इलेक्ट्रिक व्यवस्था, अग्निशमक उपकरणे आदींसह पर्यायी यंत्रणेची तपासणी करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. त्यात महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला ३३ वर्षांहून अधिक काळ झाली असून आग लागण्याचा दुर्दैवी प्रकार कधीही घडू शकतो असा आरोप आणि भिती नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

First published:

Tags: BJP, Corporator, Department, Fire, Thane, Thane municipal corporation