Home /News /maharashtra /

अवघ्या चार महिन्यांत विजय सिंघल यांच्या बदलीनं सर्वांना धक्का, या अधिकाऱ्यानं स्वीकारला पदभार

अवघ्या चार महिन्यांत विजय सिंघल यांच्या बदलीनं सर्वांना धक्का, या अधिकाऱ्यानं स्वीकारला पदभार

ठाणे, 24 जून: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्यातील अनेक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या.  त्यात ठाणे  महापालिकेत देखील आयुक्त विजय सिघल यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ.विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.  डॉ. शर्मा यांनी आपला पदभार स्वीकारून पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. लवकरच कोरोना दर कसा कमी करता येईल याचा प्रयत्न करू, असे नवनियुक्त आयुक्तांनी सांगितलं आहे. हेही वाचा.. राज्यात 24 तासांत 4000 वर रुग्ण झाले बरे; पण नवीन रुग्णांचा आकडा मात्र वाढताच मावळते आयुक्त विजय सिंघल यांची काही दिवसातच उचलबांगडी झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटू लागले आहे. एककिडे कोरोनाचे भलेमोठे संकट समोर उभे असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या मागचे नेमके करण काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक यांना पडला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजेच कोरोनाचे अपयश आहे का असा सवाल आता पुढे येऊ लागला आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देऊन सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजीव जयस्वाल यांच्या जागी विजय सिंघल यांच्याकडे आयुक्तपद देण्यात आले होते. पाच वर्षांनी ठाणे महापालिकेला नवे आयुक्त मिळाले होते. मात्र आता त्यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान नवनिर्वाचित आयुक्त विपीन शर्मा यांनी पदभार स्वीकारल्या नंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोना संदर्भात माहिती घेतली. तसेच कोरोना संदर्भात लवकरात लवकर कसे नियंत्रण मिळवता येईन याचा आढावा घेतला. येत्या दोन दिवसात संपूर्ण ठाणे शहराचा आढावा घेऊन माध्यमांशी बोलू असे यावेळी शर्मा यांनी सांगितले. या तीन महापालिकांच्या आयुक्तांची बदली राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकांच्या आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. तुकाराम मुंढे यांच्याआधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अभिजीत बांगर यांची चार महिन्यात दुसऱ्यांदा बदली झाली आहे. हेही वाचा..धक्कादायक! राज्यसभेतील 16 खासदारांवर खून, बलात्कार, दरोडा सारखे गंभीर गुन्हे अभिजीत बांगर यांची आता नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर विजय राठोड यांची मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
First published:

Tags: Maharashtra news, Thane municipal corporation, Thane news

पुढील बातम्या