Home /News /maharashtra /

राज्यात 24 तासांत 4000 वर रुग्ण झाले बरे; पण नवीन रुग्णांचा आकडा मात्र वाढताच

राज्यात 24 तासांत 4000 वर रुग्ण झाले बरे; पण नवीन रुग्णांचा आकडा मात्र वाढताच

डॉक्टर कोरालनिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक न्यूरो-कोव्हिड रिसर्च टीम तयार केली आहे आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम्सच्या प्रकारांवर आणि उपचारांवर रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना व्हायरस रूग्णांचे सखोल विश्लेषण सुरू केलं आहे. त्यातून हा अभ्यास समोर आला आहे.

डॉक्टर कोरालनिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक न्यूरो-कोव्हिड रिसर्च टीम तयार केली आहे आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम्सच्या प्रकारांवर आणि उपचारांवर रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना व्हायरस रूग्णांचे सखोल विश्लेषण सुरू केलं आहे. त्यातून हा अभ्यास समोर आला आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात Coronavirus चे नवे 3890 रुग्ण दाखल झाले. पण त्याच वेळी त्याहीपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

    मुंबई, 24 जून : गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात Coronavirus चे नवे 3890 रुग्ण दाखल झाले. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्यासारखं वाटत असतानाच आज पुन्हा आकडा वाढला आहे. पण त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे. तरी महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर देशाच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे.गेल्या 48 तासांत 72 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 136 असे 208 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले. गेले काही दिवस दररोज किमान 3700 ते 4000 दरम्यान रुग्णवाढ होत आहे. आज दिवसभरात 4161 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आलं. 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. आता UGC नेही परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय; नियमांत फेरबदल होण्याची शक्यता आतापर्यंत 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज 3530 रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पुन्हा सुरू झाली 'अॅक्शन'! लोकप्रिय मालिकांचं शूटिंग या जिल्ह्यात झालं सुरू राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 42 हजार 900 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 62,354 आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 51.64 टक्के मृत्यूदर - 4.72 टक्के सध्या राज्यात 5,57,948 लोक होम क्वारंटाइन आहेत. 33,581 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 30 हून अधिक दिवसांवर गेला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला मुंबईतील रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता तब्बल 39 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन आता 1.81% असा आहे. धारावी, कोळीवाडा इथल्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाच्या साथीवर थोडं नियंत्रण मिळालं आहे. पण अंधेरीसारख्या उच्चभ्रू उपनगरात झपाट्याने कोरोनारुग्ण वाढत आहेत. संकलन - अरुंधती
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या