मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बाळाला औषध देताना आईकडून घडली मोठी चूक; दुसऱ्या दिवशी पाण्याच्या ड्रममध्ये आढळला मृतदेह

बाळाला औषध देताना आईकडून घडली मोठी चूक; दुसऱ्या दिवशी पाण्याच्या ड्रममध्ये आढळला मृतदेह

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

ठाणे जिल्ह्यातील (Thane News) कळवामधून एक खळबळजनक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
ठाणे, 26 डिसेंबर : ठाणे जिल्ह्यातील (Thane News) कळवामधून एक खळबळजनक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथे पाच महिन्याच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये मृतदेह सापडल्यानंतर गोंधळ उडाला. पोलिसांनी या प्रकरणात रविवारी बाळाच्या आईला अटक केली आहे. बाळाच्या आईवर मुलाची हत्या करणे (Child Death) आणि पुरावे मिटवण्याचा आरोप आहे. या बाळाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, शुक्रवारी दुपारी बाळाचं महात्मा फुले नगर येथील घरातून अपहरण करण्यात आलं होतं. ज्यानंतर कळवा पोलिसांनी प्रकरण सोडवण्यासाठी एका टीमचं गठण केलं. शनिवारी सकाळी बाळाचा मृतदेह त्याच्या घराजवळील पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये सापडला. साहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, त्यांनी जवळीस सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि बाळाच्या कुटुंबासह शेजारच्यांनी चौकशी केली. यावेळी समोर आलं की, बाळ सारखं सारखं आजारी पडत होतं. बाळाच्या आईचं नाव शांताबाई चव्हाण असून तिच त्याला औषधं देत होती. मात्र शुक्रवारी तिच्याकडून चूक झाली आणि तिने बाळाला औषधांचा हाय डोस दिला. यातच बाळाचा मृत्यू झाला. हे ही वाचा-महिलेने घरातील सर्व दारू संपवली; पतीचा संताप, दुसऱ्या दिवशी दारात आढळला मृतदेह बाळाच्या मृत्यूनंतर महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी अपहरणचा प्लान केला आणि शनिवारी सकाळी पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये बाळाचा मृतदेह टाकला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान महिलेने आपला गुन्हा कबुल केला आहे.
First published:

Tags: Crime news, Thane

पुढील बातम्या