Home /News /nagpur /

बर्थ डे पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत विकृत कृत्य; मग विचित्र कारण देत तरुणाने मोडलं लग्न

बर्थ डे पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत विकृत कृत्य; मग विचित्र कारण देत तरुणाने मोडलं लग्न

Crime in Nagpur: नागपुरातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे.

    नागपूर, 01 जानेवारी: नागपुरातील (Nagpur) उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोशी शारीरिक संबंध (made sexual relation) ठेवून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला (refused to marriage) आहे. पीडितेच्या वाढदिवशी आरोपीनं तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली. तसेच आपला साखरपुडा झाला आहे, लवकरच आपण लग्न करणार आहोत, असं सांगून आरोपीनं पीडितेचं लैंगिक शोषण केलं आहे. शरीर संबंध ठेवल्यानंतर मात्र काही दिवसांनी आरोपीनं लग्न मोडलं आहे. पीडित तरुणी आपल्याला अनुरूप नसल्यास म्हणत त्याने लग्न मोडलं आहे. या प्रकरणी पीडित मुलीनं उमरेड पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कार आणि फसवणुकीअंतर्गत गुन्हा (FIR lodged) दाखल केला आहे. या प्रकरणानंतर संशयित आरोपीनं आपल्यावरी गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर म्हटलं की, आरोपीने उपस्थित केलेला अनुरूपतेचा मुद्दा खरा असता तर त्याने लग्नाला होकार दिला नसता. पीडिता शारीरिक संबंधास तयार नसताना त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं. लग्न ठरलेलेच होते. त्यामुळे युवतीनेही आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांवर विश्वास ठेवला आणि शारीरिक संबंधास होकार दिला. मात्र, आरोपीनं शारीरिक संबंधांनंतर लग्न मोडलं. त्यामुळे गैरसमजातून दिलेला होकार हा संमती म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. आरोपीने केलेली फस‌णूक ही साधीसुधी फसवणूक नसून हा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी या गुन्ह्याचा सखोल तपास होणं आवश्यक असून हा गुन्हा रद्द करता येणार नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळून लावली आहे. हेही वाचा-लग्नात झालेल्या वादाची 3 वर्षांनी आली आठवण; तरुणाने ठोसा मारून पत्नीचा पाडला दात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा भंडारा येथील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. जानेवारी 2020 मध्ये दोघंचं लग्न ठरलं होतं. दोघांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात दोघंही विवाह बंधनात अडकणार होते. पण कोरोनाची दुसरी लाट आल्यानं दोन्ही कुटुंबीयांनी हा विवाह पुढे ढकलला. दरम्यान मे महिन्यात तरुणीला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे विवाह दुसऱ्यांदा पुढे ढकलावा लागला. हेही वाचा-Mumbai: अल्पवयीन मुलीचा दीड लाखांत सौदा, सापळा रचून 2 दलालांना अटक दरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीडित तरुणीचा वाढदिवस होता. यावेळी आरोपीनं एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने आपल्या काही  मित्रांना देखील पार्टीला बोलावलं होतं. पार्टी झाल्यानंतर आरोपी पीडितेच्या खोलीत गेला आणि त्याने पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी केली. यावेळी पीडितेनं नकार दिला असता, काही दिवसांतच आपलं लग्न होणार असल्याचं खोटं आमिष आरोपीनं दाखवलं. शरीर संबंध ठेवल्यानंतर  काही दिवसांनी आरोपीनं पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage, Nagpur, Rape

    पुढील बातम्या