Home /News /maharashtra /

'ठाकरे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक', राजू शेट्टींचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी बोलावले बैठकीला!

'ठाकरे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक', राजू शेट्टींचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी बोलावले बैठकीला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावलं. उद्या दुपारी 3 वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावलं. उद्या दुपारी 3 वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावलं. उद्या दुपारी 3 वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  कोल्हापूर, 05 ऑगस्ट : 'ज्यांना आम्ही आणलं ते महाविकास आघाडी सरकार एफआरपीचे तीन टप्पे करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक आहे, अशी टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetty)  यांनी केली. तसंच, राजू शेट्टींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी बोलावलं आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार टीका केली आहे. मंत्र्यांना गाडी घ्यायला, ऑफिस सजवायला पैसे आहेत. मग पूरग्रस्तांना मदत करायला पैसे नाहीत का?  केंद्र सरकार जर दुजाभाव करत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रपती भवनवर मोर्चा काढावा, जर तुम्ही आंदोलनाला जात नसाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 रेल्वे घेऊन आंदोनासाठी जाईल. केंद्राला कोणी तरी ठणाकवून सांगितले पाहिजे, असा आक्रमक पवित्राच राजू शेट्टींनी घेतला. तालिबान्यांचं सुपर मार्केट पाहिलं का? US सैन्यांच्या बंदूकांचीही करताहेत विक्री 'आपल्याला ईडी, सीबीआयची भीती नाही. त्यामुळे आपण केंद्रीय गृहमंत्री यांना सांगितलं आहे. आंदोलनाला सरकारला बेदखल केलं. साधा तलाठी देखील आला नाही. पण सरकारला नृसिंहवाडी इथं डोकी जास्त येणार हे कळाल्यानंतर सरकारने दखल घेतली. ज्याxना आम्ही आणलं ते महाविकास आघाडी सरकार  एफआरपीचे  तीन टप्पे करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक आहे, अशी टीकाही राजू शेट्टींनी केली. केंद्र आणि राज्य आंदोलन बेदखल करण्यासाठी वेगवेगळे विषय उकरून काढत आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय कारण्यांसदर्भात  केंद्र आणि राज्य सरकारच एकमत आहे. सरकारशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला नाहीतर पुन्हा आम्ही आक्रमक होणार आज मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. मला बैठकीला बोलावलं आहे. तुमच्या सर्वांची दखल घेवून मी बैठकीला जाणार आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले, घुंगट आणि लाल लेहंगा, Bridal Look मध्ये दिसली आदिती राव हैदरी, PHOTO Viral दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावलं. उद्या दुपारी 3 वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Raju shetty, Swabhimani Shetkari Sanghatana, राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

  पुढील बातम्या