जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अब्दुल सत्तारांचे कपडे फाडा, अन्... आता राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरली!

अब्दुल सत्तारांचे कपडे फाडा, अन्... आता राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरली!

अब्दुल सत्तारांचे कपडे फाडा, अन्... आता राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरली!

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 8 नोव्हेंबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अब्दुल सत्तारांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केलं, तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली आणि सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं, अशी मागणी केली. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपनेही नाराजी व्यक्त केली. एवढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली.

जाहिरात

…मग तेव्हा काय झालं? सत्तारांवर ‘ऍक्शन’, पण अंधारेंच्या टार्गेटवर चाकणकर! अब्दुल सत्तार यांनी माफी मागितल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. एवढच नाही तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने थेट अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडण्याची ऑफर दिली आहे. अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा महेश तौर यांनी दिली आहे. अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त वक्तव्य, मग माफी, सुप्रिया सुळेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात