जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...मग तेव्हा काय झालं? सत्तारांवर 'ऍक्शन', पण अंधारेंच्या टार्गेटवर चाकणकर!

...मग तेव्हा काय झालं? सत्तारांवर 'ऍक्शन', पण अंधारेंच्या टार्गेटवर चाकणकर!

...मग तेव्हा काय झालं? सत्तारांवर 'ऍक्शन', पण अंधारेंच्या टार्गेटवर चाकणकर!

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 8 नोव्हेंबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात आंदोलन केलं आणि सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपनेही सत्तार यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. यानंतर एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. शिंदेंनी कानउघाडणी केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. महिला आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याविरोधात त्वरित कारवाई केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. सत्तारांच्या अडचणी वाढल्या; महिला आयोगाकडून गंभीर दखल, महासंचालकांना कारवाईच्या सूचना ‘गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. माझा नटी म्हणून उल्लेख केला, तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काहीच कारवाई का केली नाही? गुलाबराव पाटील यांना नोटीस का पाठवण्यात आली नाही?,’ असे सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. तसंच गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर आपण रुपाली चाकणकर यांना दोनवेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही माझा फोन उचलला नाही, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ‘मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला जबाबदारीचं भान असायला हवं. आपण कुणाला काय बोलत आहोत, याचं भान त्यांना असतं तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. सुप्रिया सुळे मित्रपक्षाच्या आहेत म्हणून नाही, तर त्या बाई आहेत म्हणून मी त्यांना पाठिंबा देत आहे. त्यांच्यासाठी लढणं हे मी माझं कर्तव्य समजते, पण माझ्यावर टीका झाली तेव्हा गुलाबरावांनाही महिला आयोगाने नोटीस पाठवायला पाहिजे होती,’ असं सुषमा अंधारे म्हणाल्या. गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंचा ‘नटी’ म्हणून उल्लेख

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात