गुहागर 07 मार्च : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना गुहागर मध्ये घडली आहे. दुसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 9 वर्षाच्या मुलीसोबत वर्गशिक्षक असलेल्या उदय वेल्हाळ या शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी संध्याकाळी समोर आलाय. या नराधमाला गुहागरच्या युवासेनच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढत चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्या शिक्षकाला पोलिसांच्याही हवाली केलं. या घटनेची चौकशी केल्यानंतर गुहागर पोलिसात शिक्षक उदय वेल्हाळवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागरच्या जानवळे गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे.
शाळेमध्ये शिक्षक आपल्यासोबत करत असलेल्या गैर कृत्याची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली आणि यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत हे प्रकरण समोर आणलंय. या घटनेनंतर गुहागरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे शिवाय शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या लहान मुलीदेखील आता असुरक्षित आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
तर मुंंबईत घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत शिक्षिकेने लहानग्या मुलीलाच चिमटे काढल्याचं उघड झालंय. मुंबईजवळचं महत्त्वाचं उपनगर असलेल्या कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार आढळून आलाय. Preschoolमधल्या शिक्षेकेनेच शाळेतल्या एका मुलीला चिमटे काढल्याचं उघडकीस आलंय. या घटनेची तक्रार पालकांनी शाळा प्रशासनाकडे केली मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला असून पालकांमध्येही भीतीही वातावरण निर्माण झालंय.
पिक्चर अभी बाकी है! शिवसेनेने रिलीज केला नवा VIDEO
हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाला आहे. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनीही अद्याप कुठलीही कारवाई केलेली नसल्यानं संताप व्यक्त होतोय. नोकरदार आईवडील कामावर जाताना आपल्या मुलांना दिवसभर सांभाळण्यासाठी डे केअर सेंटरमध्ये सोडून जातात. तिथे मुलांना दिवसभर सांभाळण्यासोबतच शिकवलंही जातं. कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा इथल्या वसंत व्हॅली परिसरात अशीच लर्निंग कर्व्ह नावाची संस्था आहे. या संस्थेत दीपक माखीजा आणि वृत्ती माखीजा हे चार्टर्ड अकाउंटंट दाम्पत्याची आपली तीन वर्षांची मुलगी दिवसभरासाठी ठेवतात. दोघेही नोकरी आणि व्यवसाय करत असल्याने मुलगी ही दिवसभर या शाळेत राहाते. मात्र 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीने शाळेतून परत जाताना आपल्याला टिचरने मारल्याचं आईला सांगितलं.
तिच्या हातावर नखं लागल्याच्या खुणाही होत्या. सगळी घटना कळाल्यानंतर वृत्ती माखीजा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर शाळेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यात खुशबू नावाची शिक्षिका या मुलीला चिमटे काढताना स्पष्टपणे कैद झाल्याचं त्यांना आढळलं. तर दुसरीकडे लर्निंग कर्व्ह संस्थेचे क्लस्टर हेड निनाद मुंडे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळे.
खतरनाक VIDEO! अमृता खानविलकरच्या अंगावर पडलं वितळतं मेण आणि...
यात आपल्या शिक्षिकेची काहीच चूक नसल्याचं सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला आता महिना झाला आहे. तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. याबाबत कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Teacher