मुंबई, 07 मार्च : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ‘खतरों के खिलाडी’च्या 10 व्या सीझनमुळे सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा सीझन सुरू झाला. मराठी इंडस्ट्रीमधून या शोमध्ये सहभागी होणारी अमृता ही पहिलीच अभिनेत्री ठरली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या स्टंटची जोरदार चर्चा सुरू आहे. हे स्टंट करणं अमृतासाठी सोपं नक्कीच नव्हतं. आताही अमृताचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तिच्या अंगावर वितळतं मेण पडताना दिसत आहे. खतरों के खिलाडीचा नवा प्रोमो नुकताच कलर्स टीव्हीच्या ऑफिशिअल अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात अमृता खानविलकर एक खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. जो पाहिल्यावर या शोमधील बाकी स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी तरळलं. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, रोहित शेट्टीनं स्पर्धकांना मेणासंबंधीत एक टास्क दिला आहे. रोहित अमृताला टास्क समजावून सांगतो, त्यानुसार अमृताला जमिनीवर झोपायचं आहे आणि मग तिच्या पायांवर गरम मेण पडणार आहे. टास्क संपेपर्यंत अमृताला हे सहन करायचं आहे. ‘सूर्यवंशी’च्या टीमसोबत खेळत होती कतरिना, अखेरच्या क्षणी अक्षयनं पलटवली बाजी
अमृता घाबरत घाबरत हा टास्क करायला जाते. पण जेव्हा तिच्या अंगावर मेण पडायला सुरुवात होते. तेव्हा ती वेदनेनं ओरडू लागते. त्यानंतर ती जास्त काळ हे सहन करु शकत नाही. यावेळी तिची अवस्था बघून बाकी स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी येतं. खतरों के खिलाडीचा हा एपिसोड प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी आणेल हे नक्की. हेमा मालिनींनी सांगितली लेकीची अनटोल्ड स्टोरी, सतर्कतेमुळे वाचली इशा देओल
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘खतरों के खिलाडी’मधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, जर एखाद्या कलाकाराला या शोची ऑफर मिळत असेल तर त्यानं ही ऑफर नक्की स्वीकारायला हवी. कारण हा शो तुम्हाला लाइफ टाइम अनुभव देतो. या शोमधील प्रत्येक स्टंट एका शॉकप्रमाणे असतो. शोमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना माझी खूप जवळची मैत्रिण झाली होती आणि आमची मैत्री आताही कायम आहे. विवाहित असूनही अनुपम खेर पुन्हा पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात!

)







