मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /यवतमाळमध्ये हेड कॉन्स्टेबलची आत्महत्या, पोलीस स्टेशनमध्येच घेतला गळफास

यवतमाळमध्ये हेड कॉन्स्टेबलची आत्महत्या, पोलीस स्टेशनमध्येच घेतला गळफास

त्यांनी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी केली आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवलेली होती.

त्यांनी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी केली आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवलेली होती.

त्यांनी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी केली आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवलेली होती.

यवतमाळ 07 मार्च : पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलनेच आत्महत्या केल्याने यवतमाळचं पोलीस स्टेशन आज हादरून गेलं. शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल राजू खंडुजी उईके (55)यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. या घटनेने सर्वच पोलीस दलात खळबळ उडालीय. आत्महत्येचं नेमकं कारण अजुन काळालेलं नाही. राजू हे गुन्हे शाखेत होते कार्यरत होते. त्यांनी पोलीस स्टेशनमधल्या डी.बी. रुममध्येच गळफास घेतला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. सर्व घटनाक्रम पोलीस तपासून पाहात आहेत.राजू हे रात्री ड्युटीवर होते. त्यांनी पहाटे 1 पर्यंत गस्त दिली.

त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. काही फोनही त्यांनी अटेंड केले आणि काही जणांशी बातचितही केली. त्यानंतर पहाटे त्यांनी DBरुममध्ये गळफास घेतला. त्यावेळी रुममध्ये कुणीही उपस्थित नव्हतं. रात्रीची वेळ असल्याने कर्मचाराही कमीच होते. सकाळी जेव्हा काही जणांनी रुममध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना धक्का बसला.

त्यांनी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी केली आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवलेली होती. आपली नोकरी जाणार या भीतीपोटी  व आजारामुळे कंटाळल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं आहे.

हे वाचा - 'तो' पुन्हा योतो आहे! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या केल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरु केला आहे. उईके यांच्या जात प्रमाणपत्राबाबात पडताळणी सुरु होती. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते अशी माहिती सांगितली जात आहे.

हे वाचा...

काँग्रेसच्या नेत्यांचही ‘जय श्रीराम’, उद्धव ठाकरेंसोबत घेणार रामलल्लांचं दर्शन

कोरोनाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, N-95 मास्कसाठी लागणार डॉक्टरांची चिठ्ठी

First published:

Tags: Sucide, Yavatmal suicide