Home /News /maharashtra /

तब्बल 9 महिन्यांनंतर सुटला गुंता! बेपत्ता वैष्णवीबाबत धक्कादायक माहिती उजेडात

तब्बल 9 महिन्यांनंतर सुटला गुंता! बेपत्ता वैष्णवीबाबत धक्कादायक माहिती उजेडात

वाशिम, 14 सप्टेंबर: वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी जाधव बेपत्ता प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. तब्बल 9 महिन्यांनंतर या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. पोलिसांनी नातेवाईकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता वैष्णवी जाधव हिची जवळच्या नातेवाईकांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती आता उजेडात आली आहे. हेही वाचा...कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा आरोप, आदित्य ठाकरेंवरही साधला थेट निशाणा मालेगाव तालुक्यातील इरळा शिवारात निर्जनस्थळी वैष्णवीचा मृतदेह आधी जाळला. तसेच दुसऱ्या दिवशी उर्वरित अवयव म्हणजे जे जळाले नाहीत ते जमिनीत पुरल्याची माहिती आरोपीनं दिली आहे. यावरून पोलिसांनी तो पुरलेला मृतदेह काढून ताब्यात घेतला आहे. काय आहे प्रकरण? इयत्ता नववी वर्गात शिकणारी वैष्णवी जाधव ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी 20 जानेवारी 2020 रोजी पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी कसोशीने तपास केला. मात्र कुठलाही सुगावा हाती लागत नव्हता. तपासासाठी दोन वेगवेगळी पथके सुद्धा तयार करण्यात आली होती. मात्र, तरीही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नव्हतं. काही संघटनांनी आक्रमक होत पोलिसांविरोधात मोर्चा सुद्धा काढला होता. मात्र, तब्बल नऊ महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. वैष्णवीची हत्या केल्याच्या आरोपावरून नातेवाईकांना अटक केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नात्यात दुरावा निर्माण होऊन वेळोवेळी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पुढील तपास करण्यात येत आहे. नराधमाला 20 वर्षे कारावास... दरम्यान, वाशिम शहरातील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना 12 जानेवारी 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी नंदू उर्फ गजानन वामन भिंगारदिवे या 50 वर्षीय नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडित मुलगी ही तिच्या घराच्या आवारात खेळण्यास गेली होती. मात्र, ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता ती नंदू भिंगारदिवे या आरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावर घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. तिची आईने विचारपूस केली असता पीडितीने सर्व घटनाक्रम आईला सांगितला. हेही वाचा...जनतेचे कलाकार आधी मुक्त करा, भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नवी मागणी आली समोर आरोपीविरुद्ध भादंवि 376 ( आय ), 377 तसेच पोक्सो कलम 4 , 12 , नुसार गुन्हा नोंदविण्यात आला . तपास अधिकारी अस्मिता मनोहर यांनी कोर्टात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे 4 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. जबरदस्त पुराव्यांमुळे तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीला कलम 376( आय ) नुसार 20 वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजाराचा दंड ठोठावला.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Washim

पुढील बातम्या